अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी मुंबईत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या घटनेला आता अडीच वर्षांहून जास्त काळ झाला आहे, पण सुशांत बद्दल अजूनही चर्चा होत असते. सुशांत हा टीव्ही अभिनेता होता. त्यानंतर त्याने अभिषेक कपूरच्या ‘काई पो चे’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेता अमित साध आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते. या तिघांनी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांसोबत दीड वर्षाहून अधिक काळ घालवला होता. अमितजवळ सुशांतच्या अनेक आठवणी आहेत. अमितने अलीकडेच बोलताना सुशांतच्या काही आठवणी सांगितल्या. तसेच २०२० मध्ये सुशांतच्या निधनाची बातमी ऐकून मी हादरलो होतो, असंही अमितने सांगितलं.

चेतन भगतशी त्याच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अमितने अनेक जुन्या गोष्टींची आठवण करून दिली. सुशांतचं जाणं हे आयुष्यातल्या काही वाईट घटनांपैकी एक आहे, असं अमित म्हणाला. तसेच “सुशांतच्या निधनाचा माझ्यावर इतका परिणाम झाला होता की मला फिल्म इंडस्ट्री सोडायची होती आणि मी तो निर्णय घेतला होता, पण स्मृती इराणींमुळे तो बदलला,” असं अमितने सांगितलं.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
Rape on 11 year girl
पाचवीतल्या मुलीवर बलात्कार आणि हत्या, दत्तक आई वडिलांचं क्रूर कृत्य

“मला त्याला भेटायचं होतं, पण त्याची जवळची व्यक्ती…”; सुशांत सिंह राजपूतच्या सहकलाकाराचा मोठा गौप्यस्फोट

इंडस्ट्री का सोडू वाटत होती, असं विचारलं असता अमित म्हणाला, “मला कंटाळा आला होता, मी संतापलो होतो, कारण याठिकाणी टिकणं कठीण आहे. सुशांबरोबर वेळ घालवणं ही सुंदर आणि खूप मोठी गोष्ट होती. त्या आठवणी कधीच जुन्या होणार नाहीत, मी, सुशांत आणि राजकुमार राव आम्ही फक्त बेस्ट फ्रेंड्स नव्हतो, तर त्या दीड वर्षात आम्ही प्रेमी होतो, अगदी राजही. माझं राजवर खूप प्रेम आहे. जर कोणी राजकुमार किंवा सुशांतबद्दल वाईट बोललं तर मला खूप राग येतो,” असं अमित म्हणाला.

“सुशांतच्या निधनाच्या काही महिन्यांपूर्वी मला त्याला भेटायचं होतं आणि मी त्यासाठी प्रयत्न करत होते. मी त्याच्या ओळखीतल्या एका व्यक्तीशी बोललो आणि त्याचा नंबर मागितला होता. मला त्याच्याशी बोलायचं होतं, मी त्याच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकत होतो. पण मला नंबरच मिळाला नाही. सुशांतने स्वतःला कोंडून घेतल्याचं त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं,” असंही अमितने सांगितलं.

Video: स्वत: रिया चक्रवर्तीनं सांगितलं होतं कोण आहे ‘AU’! ‘त्या’ मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल!

अमित साधने बॉलिवूडमधील ‘काई पो चे’, ‘सुल्तान’, ‘गोल्ड’, ‘सुपर ३०’ अशा चित्रपटांमध्ये काम केलंय. तसेच तो ‘ब्रीद’ या वेब सीरिजच्या तिन्ही भागांमध्ये झळकला होता. अमित सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.