Amitabh Bachchan Apologises : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या कामासह सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असतात. इतर कलाकारांप्रमाणे अमिताभ बच्चनही सोशल मीडियावर सक्रिय असतात. कधी कोणत्या चित्रपटाचं, कलाकाराचं कौतुक करतात तर कधी चालू घडामोडींविषयी देखील भाष्य करतात. अलीकडेच बिग बी यांनी एक पोस्ट शेअर केली होती. पण या पोस्टमध्ये त्यांच्याकडून एक चूक झाली होती. या चुकीमुळे अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांनी माफी मागितली आहे.
अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांनी इन्स्टाग्रामवर स्वतःच्या चित्रपटातील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत ते धावताना दिसत होते. तसंच चित्रपटातील त्या व्हिडीओनंतर सध्याचा व्हिडीओ होता. ज्यामध्ये अमिताभ बच्चन गार्डनमध्ये धावताना पाहायला मिळाले. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी पहिला व्हिडीओ ‘अग्निपथ’ चित्रपटातील असल्याचं म्हटलं होतं.
हेही वाचा – सलील कुलकर्णी यांच्या नव्या हॉटेलचं नाव ‘बँगलोर कॅन्टीन’ का आहे? जाणून घ्या…
व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं होतं, “‘अग्निपथ’ पासून ते आतापर्यंत धावतचं आहे. अजूनही ‘अग्निपथ’ (१९९०) पासून ते आतापर्यंत कामासाठी धावत आहे.” पण शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बिग बींचा जो धावतानाचा सीन होता, तो ‘अग्निपथ’ चित्रपटातील नाही तर ‘अकेला’ चित्रपटातील होता. ही चूक जेव्हा बिग बींच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी चाहत्यांची माफी मागितली.
हेही वाचा – Video: “मन्या बाबू…”, ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा मुलगा पुढील शिक्षणासाठी निघाला विदेशात, पोस्ट करत म्हणाले…
बिग बी काय म्हणाले?
अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवरून चाहत्यांची जाहीर माफी मागितली. ते म्हणाले, “माफ करा. ‘अग्निपथ’ संबंधित धावतानाची जी पोस्ट मी गेली होती, ती चुकीची होती. तो सीन ‘अकेला’ चित्रपटातील आहे. शुभचिंतकांचे आभार.”
हेही वाचा – Video: सलील कुलकर्णींनी अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकरसह गायलं ‘हे’ लोकप्रिय गाणं, पाहा व्हिडीओ
दरम्यान, अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांचा २७ जूनला ‘कल्कि २८९८ एडी’ (Kalki 2898 AD) चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन यांनी साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. आता बिग बी ‘कल्कि २८९८ एडी’ चित्रपटाच्या पुढच्या भागात देखील झळकणार आहेत. ‘कल्कि’ व्यतिरिक्त अमिताभ रजनीकांत यांच्यासह ‘वेट्टैयन’ चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd