शतकातील सुपरहिरो म्हटल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. पण १९८८ साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'शहेनशाह' या चित्रपटाची चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. चित्रपटातील संवाद आजही लोकांच्या ओठावर आहेत. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या लूकचीही बरीच चर्चा झाली. कारण यामध्ये त्यांनी एक खास प्रकारचे जॅकेट घातले होते, ज्याची एक बाजू स्टीलच्या तारांची होती. मात्र, हे जॅकेट आता नेमके आहे तरी कुठे आणि कोणाकडे? खुद्द अमिताभ बच्चन यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. हेही वाचा- ‘भोला’साठी अजय देवगणने आकारले ‘इतके’ कोटी; तब्बूच्या मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क एका चाहत्याने जॅकेटबद्दल केले होते ट्विट तुर्की अल्लालशिख नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर अमिताभ बच्चन यांच्या 'शहेनशाह' चित्रपटातील काही छायाचित्रे शेअर करत पोस्ट लिहिली होती, "जगातील सर्वोत्कृष्ट आणि दिग्गज अभिनेत्यांपैकी… तुम्ही केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी सन्मान आहात. "एक गोष्ट आहे..तुम्ही मला पाठवलेल्या भेटवस्तूबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्यासाठी हे खूप महत्वाचे आहे." असे त्यात लिहिले होते. अमिताभ बच्चन यांनी रिट्वीट करत दिला प्रतिसाद बिग बींनी त्यांच्या अकाऊंटवर पोस्ट रिट्विट करत त्याला प्रतिसाद दिला आहे. "माझ्या सर्वात प्रिय आणि सर्वात विचारशील मित्र. तुला स्टील आर्म जॅकेट भेट देणे खूप सन्मानाची गोष्ट आहे.. जे मी माझ्या 'शहेनशाह' चित्रपटात परिधान केले होते." मी ते घातले होते … मी ते कसे साध्य केले ते मी तुला कधीतरी सांगेन. माझ्याकडून खूप प्रेम.” बिग बींनी हे जॅकेट तुर्की अल्लालशिख नावाच्या मित्राला भेट दिले आहे. हेही वाचा- ‘तो’ लेहेंगा पाकिस्तानातून भारतात आणला कसा? खुद्द स्वरा भास्करनेच दिली माहिती, म्हणाली… अमिताभ बच्चन यांचा शहेनशाह हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला होता. ज्याचे दिग्दर्शन टिन्नू आनंद यांनी केले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत मीनाक्षी शेषाद्री, प्राण, कादर खान आणि अमरीश पुरी हे दिग्गज कलाकार दिसले होते.