jewellery: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जनतेला पुढील वर्षभरात सोनं खरेदी करू नका, परदेश दौरे टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, खाद्यतेल मर्यादित वापरा, असे आवाहन केले आहे. त्यानंतर सगळीकडे याची चर्चा होत असल्याचे दिसत आहे.

आता या सगळ्यात बॉलीवूडच्या कलाकारांकडे किती सोने आहे, याबद्दलही चर्चा होताना दिसत आहे. आता एका रिपोर्टमध्ये अमिताभ बच्चन व त्यांची पत्नी जया बच्चन यांच्याकडे किती सोने आहे, याबद्दल सांगितले आहे. त्याबद्दल जाणून घेऊ…

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांची मालमत्ता, संपत्ती याची वेळोवेळी चर्चा होते. तसेच, अमिताभ बच्चन रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असतात. याबरोबरच, जया व अमिताभ बच्चन सोन्यामध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. जया बच्चन राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, स्वतःच्या आणि त्यांचे पती, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मालमत्तेचा तपशील दिला होता.

अमिताभ-जया बच्चन यांच्याकडे आहेत ‘इतक्या’ कोटींचे दागिने

यानुसार अमिताभ बच्चन यांच्याकडे जया बच्चन यांच्यापेक्षाही जास्त सोने आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, जया बच्चन यांच्याकडे ४०.९७ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे आणि सोन्याचे दागिने आहेत, तर बिग बी यांच्याकडे ५४.७७ कोटींचे दागिने आहेत. त्यांच्या २०२४ च्या प्रतिज्ञापत्रानुसार, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांचे एकत्रित किंमत अंदाजे ९५ कोटी रुपये आहे.

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते सध्या ते कल्की २८९८ एडीच्या दुसर्‍या भागाचे शूटिंग करत आहे. ते अनेकदा शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर करतात. त्याचे किस्से सांगतात. याबरोबरच, बिग बी सेक्शन ८४ या सिनेमातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सेक्शन ८४ या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर निम्रत कौर, अभिषेक बॅनर्जी हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच, अमिताभ बच्चन ‘ब्रह्मास्त्र पार्ट २’ मध्येदेखील दिसणार आहेत.

दरम्यान, अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यामातूनही चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते त्यांच्या ब्लॉगमधून अनेक किस्से सांगतात.