Amitabh Bachchan on unfulfilled wish: अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती १८’ या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. सूत्रसंचालन करताना ते स्पर्धकांशी गप्पा मारतात. तसेच, त्यांच्याबद्दलही अनेक गोष्टींचा खुलासा करतात.

अमिताभ बच्चन यांची कोणती इच्छा राहिली अपूर्ण?

अमिताभ बच्चन यांनी नुकतेच एका स्पर्धकाशी बोलताना त्यांची कोणती इच्छा आजपर्यंत अपूर्ण राहिली आहे, याबद्दल सांगितले. ते म्हणाले, “माझी इच्छा असतानाही मी कधीच गाणं शिकलो नाही. लोक खूप चांगलं गातात किंवा सतारसारखी वाद्ये वाजवतात, त्यावेळी मला थोडे वाईट वाटते. ते इतक्या उत्तमपणे कसे गाऊ शकतात, याबद्दल मला कायमच आश्चर्य वाटते. मी कधीच हे शिकलो नाही.”

अमिताभ बच्चन (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

पुढे ते असेही म्हणाले, “मी कधीतरी हे शिकेने या आशेने माझ्या घरी सगळी वाद्ये आणून ठेवली आहेत. आता मी ८४ वर्षांचा आहे आणि वाद्ये वाजवण्यास अजूनही शिकलो नाही. त्यामुळे वाईट वाटते.”

स्पर्धकाने त्यांना असेही विचारले की तुमच्या आयुष्यातील असा कोणता दिवस आहे, जो पुन्हा जगायला आवडेल? यावर अमिताभ बच्चन म्हणाले की प्रामाणिकपणे सांगायचे तर आयुष्यात खूप गोष्टी घडल्या आहेत, त्यामुळे कोणता ठराविक एक दिवस निवडावा, हे मला माहीत नाही.

अमिताभ बच्चन (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

कौन बनेगा करोडपती हा शो सोनी टीव्ही प्रदर्शित होतो. सोमवार ते शुक्रवार या दरम्यान या शोचे एपिसोड प्रेक्षकांना पाहता येतात. या शोमध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या करिअरबरोबरच त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल खुलासा करतात.

अमिताभ बच्चन (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

दरम्यान, अमिताभ बच्चन लवकरच ‘कल्की २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.