Amitabh Bachchan’s emotional post after death of Sanjay Gupta: दिग्दर्शक व निर्माते संजय गुप्ता यांचे ३० ऑक्टोबर २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडवर शोककळा पसरली. अनेक कलाकारांना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये संजय गुप्ता यांच्याबद्दल लिहिले आहे.

“कलेवर मनापासून प्रेम करणारा माणूस…”

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले, “एक मित्र, सहकलाकार आणि कलेवर मनापासून प्रेम करणारा माणूस इतक्या कमी वयात आपल्याला सोडून गेला आहे. हे सगळं कसं घडत आहे, हे मला समजत नाही. कलेच्या जगातील जवळचे सहकारी सोडून जात आहेत.”

त्यांनी पुढे लिहिले, “लोक म्हणतात की, सूर्यमालेतील सर्व शक्तिशाली ग्रह एकाच वेळी प्रतिकूल झाले आहेत.” पुढे ग्रहांना उद्देशून बिग बींनी असे लिहिले, “आमच्यावर दया करा. आमच्यावर प्रकोप करणं खरंच योग्य आहे का? सूर्यमालेतील सर्व ग्रहांनी आपापल्या घरी परत जावे आणि एकमेकांपासून दूर राहावे. कदाचित मग ते त्रास देणं थांबवतील.”

नाना पाटेकर यांच्या निधनानंतरही अमिताभ बच्चन यांनी भावूक पोस्ट शेअर केली होती.

संजय गुप्तांच्या निधनाचे कारण काय?

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गुप्ता यांना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात पडल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन, त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी, दोन मुलं आणि घरातील मदतनीस त्यांच्याबरोबर राहत होते. मात्र, जेव्हा घटना घडली तेव्हा सर्व जण झोपलेले असल्याने शनिवारी सकाळी हा प्रकार समोर आला.

शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास वर्सोवा स्मशानभूमीत संजय गुप्ता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अभिषेक बच्चनसह बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.