Amitabh Bachchan Photo: महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. तसेच ते ब्लॉगही लिहितात. अशीच एक पोस्ट बिग बी यांनी केली आहे. यात त्यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी या फोटोबरोबर दिलेल्या कॅप्शनने लक्ष वेधले आहे.
हेही वाचा – सोहेल खानच्या घरीच राहतात त्याची दोन्ही मुलं, पालकांच्या घटस्फोटानंतर आईकडे जात नाहीत, कारण…
अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती’चे होस्ट आहेत. त्यांनी या शोच्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये एकजण त्यांच्या चेहऱ्यावरील मेकअप सेट करतोय, तर दुसरी व्यक्ती त्यांचे केस नीट करत आहे. या फोटोबरोबर बच्चन यांनी “जेवढे प्रयत्न करायचे आहेत, तितके करा भावांनो, चेहऱ्याला आता काहीच होणार नाही,” असं कॅप्शन दिलं आहे. बिग बी यांनी शेअर केलेला हा फोटो व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Video: डिंपल कपाडियांचा लेकीबरोबर फोटो काढण्यास नकार; ट्विंकल खन्नाचा ‘ज्युनिअर’ असा उल्लेख करत म्हणाल्या…
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला फोटो
अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर चाहते विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. ‘हा चेहरा मौल्यवान आहे, काळजी घ्या’, असं काहींनी म्हटलं आहे. तर काहींनी अमिताभ बच्चन या वयात एवढं काम करतात, त्यासाठी कौतुक केलं आहे. काहींनी त्यांच्या या पोस्टवर रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
हेही वाचा – Video: ऐश्वर्या रायशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान वैतागलेला अभिषेक बच्चन कॅमेऱ्यासमोर हात जोडून म्हणाला…
दरम्यान, बच्चन कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत असतं. गेले काही महिने तर अमिताभ बच्चन व जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबद्दल खूप चर्चा होत आहे. दोघेही वेगळे झाले असून ऐश्वर्या राय तिच्या आईच्या घरी राहत असल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या, अभिषेक किंवा बच्चन कुटुंबाने आतापर्यंत यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यातच आता अभिषेक बच्चनचं एका बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचं म्हटलं जातंय.