Chetak Screen Awards 2026: लवकरच चेतक स्क्रीन अवॉर्ड सोहळा पार पडणार आहे. ५ एप्रिल २०२६ ला हा सोहळा मुंबईत पार पडणार आहे. या निमित्ताने २०१७ मध्ये पार पडलेल्या सोहळ्यातील काही खास किस्से जाणून घेऊ…

२०१७ ला पार पडलेल्या सोहळ्यात अनेक कलाकारांना त्यांच्या कामासाठी गौरविण्यात आले होते. त्यापैकी एक अमिताभ बच्चन होते. ‘पिंक’ चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देण्यात आला होता.

सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच ‘सुल्तान’ चित्रपटातील भूमिकेसाठी सलमान खान, ऐ दिल है मुश्किल चित्रपटासाठी रणबीर कपूर, रुस्तम आणि एअरलिफ्ट चित्रपटासाठी अक्षय कुमार आणि फॅन चित्रपटासाठी शाहरुख खान हे कलाकारदेखील नॉमिनेट होते. मात्र, सर्वांना मागे टाकत अमिताभ बच्चन यांनी हा पुरस्कार जिंकला होता.

Award Banner

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी पुरस्कार जिंकला. तेव्हा त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी ते म्हणाले होते की, पिंक चित्रपटातून जो संदेश दिला आहे, त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी, त्यांचा आदर केला जावा यासाठी चित्रपटातून दिलेला संदेश खूप महत्वाचा आहे. नाहीचा अर्थ नाही असाच असतो(No Means No), असे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. त्यातून हे समजते की महिलांबरोबर कायम सन्मानाने आणि बरोबरीने वागले पाहिजे.

अमिताभ बच्चन यांनी लेक श्वेता बच्चनसाठी केलेली खास गोष्ट

अमिताभ बच्चन असेही म्हणाले होते की महिलांवर आधारित जे चित्रपट असतात, त्याचा भाग असण्याचा मला अभिमान आहे. पिंकसारख्या चित्रपटांमुळे भविष्यात मला कशा प्रकारचे चित्रपट करायचे आहेत, त्याची स्पष्टता आली.

या सोहळ्यात अमिताभ बच्चन त्यांच्या मुलीबरोबर श्वेता बच्चनबरोबर आले होते. जेव्ह त्यांना हा पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या मुलीला श्वेता बच्चनला समर्पित केला.

पिंक चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट २०१६ ला प्रदर्शित झाला होता. अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सामाजिक विषयावर आधारित या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. या सिनेमात तापसी पन्नू, कीर्ति कुल्हारी, अंगद बेदी, तुषार पांडे, धृतिमान चटर्जी, पीयूष मिश्रा हे कलाकार महत्वाच्या भूमिकांत दिसले होते.

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते लवकरच कल्कि २ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.