मागच्या अनेक दिवसांपासून जगभरात क्रिकेट विश्वचषक २०२३ चा उत्साह होता. या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान झाला. भारताने दिलेलं २४१ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने ४३ षटकारात पूर्ण केलं. त्यांनी सहा गडी राखून भारताचा पराभव केला आणि एकदिवसीय विश्वचषकावर सहाव्यांदा नाव कोरलं. भारताच्या पराभवानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केली आहे.
“बच्चन साहेबांनी लपून मॅच पाहिली,” फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट
“टीम इंडिया.. काल रात्रीचा निकाल हा तुमच्या प्रतिभेचे, कर्तृत्वाचे आणि योग्यतेचे प्रतिबिंब नाही.. आम्हाला तुमचा अभिमान आहे.. चांगल्या गोष्टी घडतील..तुम्ही खेळत राहा,” अशी त्यांनी एक पोस्ट केली आहे.
दुसऱ्या पोस्टमध्ये बिग बी म्हणाले, “तुमची प्रतिभा, क्षमता आणि योग्यता या सगळ्याच्या पलीकडे आहे आणि खूप वर आहे. तुम्ही खेळलेल्या १० सामन्यांच्या निकालांनी हे दाखवून दिले की तुम्ही असा संघ आहात ज्यांनी इतरांना नमवलं. या विश्वचषकात तुम्ही किती माजी चॅम्पियन आणि विजेत्यांना हरवलं ते पाहा. तुम्ही सर्वोत्तम आहात आणि राहाल.”
दोन एक्स पोस्टबरोबरच अमिताभ बच्चन यांनी एक इन्स्टाग्राम पोस्टदेखील केली आहे. स्वतःचाच फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “नाही, नाही, नाही. टीम इंडिया तुम्ही अजुन बाहेर पडलेला नाहीत. तुम्ही आमचा अभिमान आहात. तुम्ही ते हृदय आहात जिथे आमचे हात टेकतात.”
दरम्यान, ‘भारतीय संघातील सर्व खेळाडू चांगले खेळले आहेत, लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे, पण त्यांना विश्वचषक जिंकता आला नाही, पण आता भारतीय संघाने आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे,’ ‘भारतीय संघ उत्तम खेळला पण अंतिम सामना जिंकता आला नाही,’ अशा कमेंट्स बिग बींच्या या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.