महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली, अशा बातम्या समोर येत होत्या. शुक्रवारी सकाळी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आलं आणि त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली असं म्हटलं जात होतं, पण आता स्वतः अमिताभ बच्चन यांनी या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी संध्याकाळी इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीगच्या अंतिम सामन्याला हजेरी लावली. या सामन्यातील एक फोटो अमिताभ बच्चन यांनी शेअर केला आहे. ISPL फायनलच्या संध्याकाळचा अनुभव खूप चांगला होता. सचिनबरोबर वेळ घालवला आणि क्रिकेटबद्दल त्याच्याकडून जाणून घेता आलं, अशा आशयाची पोस्ट अमिताभ बच्चन यांनी केली आहे.

west bengal woman beaten up
“मला लाथा मारल्या, शिवीगाळ केली कारण…”, विवाहबाह्य संबंधांमुळे मारहाण झालेल्या महिलेनं मांडली व्यथा; म्हणाली, “तुम्ही व्यवस्थेला…”
loksatta ulta chasma
उलटा चष्मा: लाडका भाऊराया..
What Kiran Mane Said?
किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत! “ज्या अपयशापासून पळून जाण्यासाठी सत्ताधारी ‘हिंदुत्व’ शब्दाचा..”
love marriage, husband,
प्रेमविवाहाचा रक्तरंजित अंत; अनैतिक संबंध उघडकीस येताच पतीने पत्नीला संपवले
Did Sania Mirza Marry Mohammad Shami Wedding Photos Going Viral
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाचा फोटो होतोय व्हायरल? सानियाच्या वडिलांनी दिलेलं स्पष्टीकरण आधी वाचा
Nana Patekar reacts on tanushree dutta metoo allegations
तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल नाना पाटेकरांची मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या गोष्टीचा…”
children, couples, issues,
दुसरं मुलं हवं की नको?…
Parth Pawar, Rohit Pawar, Ajit Pawar,
पक्षात नाराज असल्याच्या चर्चांवर रोहित पवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “माझ्या स्वभावानुसार…”

आयएसपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर तिथून बाहेर पडताना अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ‘इन्स्टंट बॉलीवूड’ने त्यांना प्रकृतीबद्दल विचारलं असता त्यांनी ‘फेक न्यूज’ असं म्हटलं. याचाच अर्थ अमिताभ बच्चन यांना काहीच झालेलं नाही.

 “तुम्ही शूद्र मनाचे अतिशय शूद्र माणूस आहात,” म्हणणाऱ्या युजरला शरद पोंक्षेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “मराठी…”

८१ वर्षीय अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांनी ‘ग्रॅटिट्यूड’ असं लिहून एक पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती येऊ लागली. पण आपल्याला काहीच झालं नसल्याचं खुद्द अमिताभ बच्चन यांनीच स्पष्ट केलं आहे.