‘कौन बनेगा करोड़पति’ टेलिव्हिजवरील प्रसिद्ध कार्यक्रम आहे. सध्या या कार्यक्रमाचे १५ वे पर्व सुरु आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. कार्यक्रमादरम्यान अमिताभ आपल्या खासगी आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. नुकतच अमिताभ यांनी त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे. हेही वाचा- संकर्षण कऱ्हाडेने विमानतळावर काढली रात्र, चाहत्याच्या ‘त्या’ कमेंटवर उत्तर देत म्हणाला, “या ठिकाणी…” अमिताभ म्हणाले, "अलाहाबादमध्ये मी लहान असताना उन्हाळ्यात आम्ही बाहेर झोपायचो. कारण घरात खूप गरम व्हायचं. एक दिवस मी झोपलो असताना माझ्या हातावर बेडूक येऊन बसला. त्याला वाटले इथं खायला काहीतरी आहे म्हणून त्याने जीभ बाहेर काढली. तेव्हा मला समजले की काही खाण्यासाठी बेडूक आपली जीभ बाहेर काढतात. तेव्हापासून मी माझे हात कधीही बाहेर काढत नाही. नेहमी माझ्या खिशात ठेवतो. " दरम्यान अमिताभ यांनी त्यांच्या आरोग्याचे गुपितही सांगितले आहे. ते म्हणाले, "हळदीमध्ये चांगले औषधी गुणधर्म आहेत. जर एखाद्या व्यक्तीने पाण्यात हळद घालून ते नियमित प्यायले तर त्याचे आरोग्य चांगले राहते. मी रोज झोपण्यापूर्वी पाण्यात हळद घालून पितो." हेही वाचा- “मला त्या मालिकेचा एक पैसाही दिला नाही, अन्…”, उषा नाडकर्णींनी मॅनेजरला दिलेली धमकी, म्हणालेल्या “तुझी च**” अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’च्या १५ व्या पर्वाला पहिला करोडपती काही दिवसांपूर्वी मिळाला. पंजाबचा २१ वर्षीय जसकरण सिंग या हंगामातील पहिला करोडपती ठरला. त्याने १ कोटी रुपये जिंकत यंदाच्या पर्वातील पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला आहे.