महानायक अमिताभ बच्चन दर रविवारी जलसा बंगल्याबाहेर आलेल्या चाहत्यांची भेट घेतात, त्यांना अभिवादन करतात. गेल्या अनेक वर्षांपासून रविवारी चाहत्यांचं येणं आणि बिग बींनी भेट घेणं हे रुटीन बनलं आहे. चाहत्यांची भेट घेताना ते पायातील चप्पल, बूट काढून ठेवतात. बऱ्याचदा त्यांना यामागचं कारण विचारलं जातं. अखेर त्यांनी पायातील चप्पल काढून चाहत्यांची भेट घेण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.

कोणत्या महिलेसाठी बिपाशाची फसवणूक करशील? करण जोहरच्या प्रश्नावर जॉन अब्राहम म्हणाला होता, “फक्त…”

Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”
Amiatbh Bachchan And Rekha
रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”
amitabh bachchan did mohabbatein
अमिताभ बच्चन यांनी फक्त एक रुपया मानधनावर केलं होतं ‘मोहब्बतें’मध्ये काम; प्रसिद्ध निर्मात्याचा खुलासा
amitabh bachchan reaction after seeing vitthal murti
Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक
Uddhav Thackeray SS UBT
“एकनाथ शिंदे नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावी गेलेत”, संजय राऊतांचा बोचरा वार; नेमकं काय म्हणाले?
Amitabh Bachchan
“अमिताभ बच्चन यांच्या डोक्यावर मारल्याने…”, ‘सिकंदर का मुकद्दर’मधील ‘या’ अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा….

“… ते मला सतत विचारतात.. ‘कोण अनवाणी पायाने चाहत्यांना भेटायला जातं’? मी त्यांना म्हणतो- ‘मी जातो.. तुम्ही अनवाणी पायाने मंदिरात जाता ना.. मग रविवारी येणारे माझे हितचिंतक माझं मंदिर आहेत!! तुम्हाला त्यापासून काय अडचण आहे,’ असं अमिताभ बच्चन यांनी एक फोटो पोस्ट करत लिहिलंय. या फोटोत बिग बी अनवाणी पायाने चाहत्यांना भेटताना दिसत आहेत.

दरम्यान, अमिताभ बच्चन दर रविवारी ‘जलसा’बाहेर चाहत्यांची भेट घेतात. जेव्हा त्यांना भेट शक्य नसते, तेव्हा ते त्यांचा ब्लॉग व ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना आधीच माहिती देतात. आज ६ जून रोजी त्यांनी रविवारच्या भेटीचा एक फोटो टाकला. यावेळीही ते अनवाणी होते आणि यामागचं कारणही त्यांनी सांगितलं.

कामाबद्दल बोलायचं झाल्यास बिग बी सध्या नाग अश्विनच्या ‘प्रोजेक्ट के’ साठी शूटिंग करत आहेत. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना सेटवर दुखापत झाली होती, त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांनी पुन्हा शूटिंग सुरू केलं आहे. याशिवाय ते त्यांच्या इतर प्रोजेक्टच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहेत.

Story img Loader