Amitabh bachchan post about Ethics : अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते जवळपास दररोज त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करतात. त्यांनी काही तासांपूर्वी एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट एथिक्सबद्दल आहे. ही पोस्ट बिग बींनी नेमकी कशाबद्दल केली, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अमिताभ बच्चन यांनी केलेली ही पोस्ट धर्मेंद्र यांच्या मृत्यूबद्दल अफवा पसरल्या, त्यासंदर्भात आहे, की जया बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याबद्दल ही पोस्ट आहे, असं चाहते कमेंट्स सेक्शनमध्ये विचारत आहेत.
‘T 5564 – कोणतीच नीतिमूल्ये नाहीत’, अशी पोस्ट अमिताभ बच्चन यांनी केली आहे. अमिताभ यांनी एक्सवर ही पोस्ट केल्यावर कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी एक चूक काढली आहे. ‘कोई भी अचार-नीति नहीं’ असं बिग बींनी हिंदीमध्ये लिहिलं आहे. ते अचार नाही तर आचार असतं, असं नेटकरी म्हणत आहेत. तसेच काहींनी जया बच्चन पापाराझींवर भडकल्या तो व्हिडीओ कमेंट्समध्ये शेअर केला आणि बिग बी याबद्दल बोलत आहेत असं म्हटलं.
अमिताभ बच्चन यांची पोस्ट

दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतीच त्यांचे मित्र धर्मेंद्र यांची घरी जाऊन भेट घेतली आणि प्रकृतीबद्दल विचारपूस केली. ८९ वर्षांचे धर्मेंद्र दोन आठवड्यांपासून आजारी आहेत, आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवस रुग्णालयात ठेवल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं. धर्मेंद्र यांच्या भेटीनंतर अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट केली, त्यामुळे धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या अफवेबद्दल ही पोस्ट असावी असा अंदाजही काही युजर्सनी व्यक्त केला आहे.
जया बच्चन यांचा व्हायरल व्हिडीओ
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर संतापल्या आहेत. त्यांनी सर्वांसमोर पापाराझींना फटकारलं आणि तोंड बंद ठेवण्यास सांगितलं. गुरुवारी संध्याकाळी जया बच्चन फॅशन डिझायनर्स अबू जानी आणि संदीप खोसला यांनी आयोजित केलेल्या फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांची मुलगी श्वेता नंदा देखील उपस्थित होती.
जया बच्चन मुलगी श्वेताबरोबर या इव्हेंटमधून बाहेर पडत होत्या. पण पापाराझी तिच्या जवळ येताच त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी थांबून पापाराझींना रागात म्हटलं, “नीट वागा, गप्प राहा, फोटो काढा, पुरे झालं आता. नुसते कमेंट करत असता.” भडकलेल्या जया बच्चन यांना मुलगी श्वेता तिथून घेऊन गेली.
