बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती ज्युनियर’ हा शो होस्ट करत आहेत. यावेळी ते या लहान स्पर्धकांना प्रश्न विचारताना खूप गप्पा मारतात. मुलांचं बोलणं ऐकून घेतात, त्यांच्या तक्रारी ऐकतात व त्यांना ते त्यांच्या आयुष्यातील काही किस्सेही सांगत असतात. ताज्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाशी बोलताना त्यांनी पत्नी जया यांच्या उंचीबद्दल भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरियाणाचा मयंक या शोमध्ये हॉटसीटवर बसला होता. मयंक भावुक झाला आणि रडू लागला. अमिताभ यांनी त्याला शांत केलं. मयंक आठव्या वर्गात शिकतो आणि त्याचे वडील दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबल आहेत. अमिताभ मयंकला म्हणतात की तुझे वडील पोलिसात आहेत याचा तुला अभिमान असायला हवा. यावर मयंक म्हणतो, “कोणीही माझ्याशी भांडत नाही. वडील पोलीस असल्याचे अनेक फायदे आहेत.”

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी

यानंतर मयंक म्हणतो की त्याला त्याची उंची आवडत नाही. मयंक म्हणाला, “सगळे माझ्या उंचीची खिल्ली उडवतात, मी जेव्हा उभा राहतो, तेव्हा माझ्यापेक्षा उंच कोणीतरी माझ्यासमोर उभं राहतं आणि मी झाकला जातो.” यावर अमिताभ मयंकला म्हणतात, “माझ्याबरोबरही असंच घडतं.” मग मयंक म्हणाला, “तुम्ही तर उंच आहात”. यावर अमिताभ उत्तर देतात, “माझ्या बाबतीत उलट घडतं. माझी पत्नी तुझ्या उंचीची आहे आणि तिला माझ्याकडे डोकं वर करून पाहावं लागतं.” याबद्दल ‘एबीपी लाइव्ह’ने वृत्त दिलंय.

श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत का राहते? पतीबरोबर न राहण्याचं कारण काय? जाणून घ्या

दरम्यान, अमिताभ बच्चन व त्यांची पत्नी जया बच्चन हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं आहे. दोघांच्या लग्नाला ५० वर्षे झाली आहे. अमिताभ बच्चन या शोमध्ये अनेकदा त्यांच्या आयुष्यातील किस्से, त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल भाष्य करत असतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan talks about wife jaya bachchan height in kaun banega crorepati junior hrc
First published on: 28-11-2023 at 14:10 IST