Amrish Puri Slapped Smita Patil : अमरीश पुरी  व स्मिता पाटील भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठी नावं आहेत. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने कायमच प्रेक्षकांचंं मनोरंजन केलं आहे. आज ते हयात नसतानाही अनेक जण त्यांच्या कलाकृती तितक्याच आवडीने पाहताना दिसतात. आजही त्यांच्या कामाचं कौतुक होतं, त्यांच्याबद्दल बोललं जातं. 

८०-९० दरम्यान अमरीश पुरी यांनी खलनायकाची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक निर्माते त्यांना त्यांच्या चित्रपटात काम देण्यासाठी उत्सुक असायचे. त्याच दरम्यान अमरीश पुरी यांनी एका चित्रपटात काम करत असताना त्यांनी चक्क स्मिता पाटील यांना कानाखाली लगावली होती. हा किस्सा आहे १९८३ मध्ये आलेला ‘मंडी’ या चित्रपटाचा. यामध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं. त्या चित्रपटादरम्यानचा हा किस्सा आहे. 

अमरीश पुरी यांनी स्मिता पाटील यांना मारलेली कानाखाली

‘मंडी’ या चित्रपटात अमरीश पुरी व स्मिता पाटील यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक कलाकार झळकले होते. या चित्रपटाच्या सेटवर सगळ्यांसमोर त्यांनी स्मिता पाटील यांना एक सीन करताना कानाखाली मारली होती. यामागचं कारण असं की – या चित्रपटात एक सीन आहे जिथे अमरीश पुरी स्मिता पाटील यांना बाहेर जाण्यापासून थांबवत असतात. परंतु, स्मिता ते ऐकत नाहीत. त्यामुळे सीन अजून खरा वाटावा म्हणून अमरीश पुरी यांनी दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना ते सीनसाठी स्मिता यांनी खरोखर कानाखाली मारू शकतो का असं विचारलं. त्यावेळी दिग्दर्शकांनी स्मिता अर्ध्यातच शूटिंग सोडून जातील या भीतीने आधी नाही म्हटलं होतं. पण, नंतर त्यांनी यासाठी होकार दिला. त्यानंतर अमरीश यांनी खरोखर त्या सीनमध्ये स्मिता पाटील यांना कानशिलात लगावली.”

अमरिश यांनी जेव्हा सीनमध्ये स्मिता यांनी खरोखर कानशिलात लगावली तेव्हा त्यांना या सीनमध्ये अमरीश पुरी त्यांना खरोखर कानाखाली मारणार आहेत याबद्दल माहिती नव्हती. परंतु, या सीनदरम्यान स्मिता यांची जी प्रतिक्रिया होती ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. पण, असं म्हटलं जातं की तेव्हा स्मिता यांना धक्का बसला होता. असंही म्हटलं जातं की त्यावेळी सेटवरही सगळेच जण आश्चर्यचकित झाले होते. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी खूप विचार करून तो सीन ओके केला होता. सीनमध्ये अमरिश पूरी यांनी स्मिता पाटील यांना कानशिलात लगावली. पण सीन संपल्यावर स्मिता पाटील त्यांच्यावर प्रतिसहल्ला करण्यासाठी त्यांच्या मागे धावल्या. हे पाहून संपूर्ण युनिटमध्ये हशा पिकला.

अमरिश पूरी यांनी स्मिता पाटील यांचं केलेलं कौतुक.

अमरीश पुरी यांनी एका मुलाखतीत स्मिता पाटील यांचं कौतुक केलं होतं. ते म्हणालेले, “ती खूप उत्तम अभिनेत्री आहे आणि तिने खूप चांगलं काम केलं होतं.”. दरम्यान, या चित्रपटात स्मिता पाटील व अमरीश पुरी यांच्याबरोबर शबाना आझमी, सोनी राजदान, ओम पुरी, रत्ना पाठक, पंकज कपूर यांसारखे अनेक कलाकार झळकले होते.