scorecardresearch

मॅनेजरने ऑफर लपवली अन् अमृता रावच्या हातून गेला सलमान खानचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट; अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली…

नुकताच अमृता रावने तिच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ या पुस्तकात एक खुलासा केला आहे.

salman khan amrita rao
(फोटो – इन्स्टाग्राम)

बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेली अमृता राव कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचं युट्यूब चॅनल, तिचं आयुष्य आणि सध्या ती तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आहे. नुकताच अमृता रावने तिच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ या पुस्तकात एक खुलासा केला आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या सुपरहिट चित्रपट ‘वॉन्टेड’साठी तिला अप्रोच करण्यात आले होते, असं तिने पुस्तकात म्हटलं आहे.

“समर सिंह तिला मारहाण करायचा”, आकांक्षा दुबेच्या कुटुंबाचे गंभीर आरोप; म्हणाले, “त्याने ५ कोटी…”

अलीकडेच अमृता रावने तिच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ या पुस्तकात सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ चित्रपटाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. अमृता राव म्हणाली, “काही महिन्यांपूर्वी मला समजले की मला सलमान खानच्या एका चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आलं होतं. त्यादरम्यान मी साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत एका तेलुगू चित्रपटाचे शूटिंग करत होती. शूटिंगनंतर, मी हॉटेलमध्ये प्रोडक्शन टीममधील एका व्यक्तीला भेटले होते, त्याने बोनीजी यांच्याबरोबर काम केले होते.”

आकांक्षा दुबेला हॉटेलात सोडणारा ‘तो’ तरुण पोलिसांच्या ताब्यात; आत्महत्येच्या रात्री दोघांची भेट कशी झाली? खुलासा करत म्हणाला…

पुढे ती म्हणाली, “त्यांनी माझी विचारपूस केली आणि म्हटलं की तुमच्या तारखा जुळत असत्या तर तुम्ही सलमान खानच्या वॉन्टेड चित्रपटासाठी आमच्याबरोबर काम केलं असतं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला कोणी सांगितले की माझ्याकडे वेळ नाही. त्यावर ते म्हणाले की आम्ही तुमच्या मॅनेजरला फोन केला होता. पण, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही व्यग्र आहात आणि तुमच्या तारखा फ्री नाही.”

परिणीती चोप्रा-खासदार राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार? दोन्ही कुटुंबियांची बोलणी सुरू

अमृताने मॅनेजरचा राग आल्याचंही सांगितलं. “हे ऐकून मला वाईट वाटलं, माझ्या मॅनेजरने माझ्यापासून एवढी मोठी ऑफर लपवून ठेवली होती, मला माहीत नव्हतं. एवढी मोठी ऑफर मिळाली आहे, हे माहीत असतं तर काहीह करून वेळ काढला असता. शेवटी मी रागात मॅनेजरला कामावरून काढलं” असं अमृता म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 15:58 IST

संबंधित बातम्या