scorecardresearch

Premium

‘घूमर’चा ट्रेलर पाहून आनंद महिंद्रांनी केलं अभिषेक बच्चनचं कौतुक; अभिनेता म्हणाला, “मला तुमच्याबद्दल…”

आनंद महिंद्रांनी ट्वीट करत अभिषेक बच्चनच्या अभिनयाचे केले कौतुक, अभिनेता रिप्लाय देत म्हणाला…

anand mahindra praises abhishek bachchan in goomer

अभिषेक बच्चन आणि सय्यामी खेरच्या मुख्य भूमिका असलेला घूमर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ४ ऑगस्ट रोजी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. आर बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. अशातच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्रेलरचं आणि अभिषेक बच्चनचं कौतुक केलंय. त्यांच्या कौतुकाच्या ट्विटवर अभिषेकनेही प्रतिक्रिया दिली.

राहुल गांधींच्या कथित ‘फ्लाइंग किस’वर वाद; टीका करणाऱ्या स्मृती इराणींवर प्रसिद्ध अभिनेत्याचा संताप; म्हणाले, “मॅडमजी…” 

anupam-kher-jail
तुरुंगात ५० लोकांसह अनुपम खेर यांनी घालवलेली एक रात्र; खुद्द अभिनेत्यानेच सांगितला किस्सा
adah-sharma
‘द व्हॅक्सिन वॉर’वर प्रतिक्रिया देण्यास अदा शर्माने दिला नकार; अभिनेत्रीने सांगितलं यामागील कारण
Anil Sharma on Govinda
“बिचारे गोविंदा, त्यांना…”, ‘गदर २’ च्या दिग्दर्शकाने अभिनेत्याला लगावला टोला, नेमकं काय घडलं?
south actress sai pallavi
दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने लग्नाच्या अफवांवर सोडलं मौन; नाराजी व्यक्त करत म्हणाली…

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘घूमर’चा ट्रेलर शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिलं की, “क्रिकेटबद्दलचे आमचे वेड एका नवीन स्तरावर नेण्याचे वचन देत बाल्की परत आले आहेत. पण या चित्रपटाचं खरं आश्वासन म्हणजे अभिषेक बच्चन आहे. मागील काही वर्षांमध्ये तो सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांप्रमाणे आपली क्षमता सिद्ध करत आहे.”

आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना अभिषेक बच्चन म्हणाला “प्रिय आनंद महिंद्रा मी नि:शब्द आहे, म्हणून मी टाईप करतोय! तुमचा पाठिंबा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. धन्यवाद! तुम्हाला चित्रपट दाखवण्याची प्रतीक्षा आता करू शकत नाही. मला तुमच्याबद्दल आदर, कौतुक आणि प्रेम आहे.”

दरम्यान, ‘घूमर’ चित्रपट एका विकलांग खेळाडूच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर बेतलेला आहे. या महिला क्रिकेटपटूची भूमिका अभिनेत्री सैयामी खेरने केली आहे. हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anand mahindra praises abhishek bachchan in ghoomer trailer sayami kher hrc

First published on: 10-08-2023 at 14:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×