Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी राधिका मर्चंटबरोबर १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधणार आहे. या भव्य लग्नसोहळ्याच्या पूर्वीच्या समारंभाची सुरूवात झाली आहे. काल ५ जुलै रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर येथे अनंत-राधिकाचा संगीत सोहळा पार पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनंत-राधिकाच्या या संगीत सोहळ्याला बॉलीवूड, तसेच क्रिडा क्षेत्रातील मंडळींसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरने या संगीत सोहळ्यात खास परफॉर्मन्स केला होता. अनेक बॉलीवूड कलाकार जस्टिनच्या लोकप्रिय गाण्यांवर थिरकताना दिसले. बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीने चक्क परफॉर्मन्स सुरू असतानाच जस्टिनला मिठी मारली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जस्टिन बीबर स्टेजवर परफॉर्म करताना दिसतोय. त्याचा परफॉर्मन्स सुरू असतानाच अचानक जस्टिनची चाहती त्याची गळाभेट घेते आणि त्याला मिठी मारून, ती स्टेजवरून खाली उतरते. ही चाहती दुसरी तिसरी कोणी नसून, अभिनेता जावेद जाफरी यांची मुलगी अलाविया जाफरी (Alaviaa Jaffrey) आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

हेही वाचा… “भाई अभी रुलाएगा…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चाहते झाले भावुक, म्हणाले…

‘विरल भयानी’ या पापाराझी अकाउंटवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. “ती भाग्यवान आहे.” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करीत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जस्टिन बीबर सात वर्षांनंतर भारतात अनंत-राधिका यांच्या संगीत सोहळ्यासाठी आला होता. मुकेश अंबानी यांनी जस्टिनला या परफॉर्मन्ससाठी १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ८३ कोटी रुपये मानधन दिल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा… विकी कौशलच्या फोनचा वॉलपेपर होतोय व्हायरल, फोटोमध्ये आहे कतरिनाच्या बालपणाची आठवण

दरम्यान, अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा मार्च महिन्यात भव्य स्वरूपात गुजरात येथील जामनगर येथे पार पडला. या सोहळ्याला जगभरातील अनेक प्रसिद्ध आणि नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती. तसंच गेल्या महिन्याच्या सुरूवातीला या जोडप्याचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटली येथे पार पडला. अनंत आणि राधिका आता लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. या जोडप्याची लग्नपत्रिकादेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याप्रमाणे या लग्नसोहळ्यातही पाहुण्यांसाठी खास पारंपरिक थीम्स ठेवण्यात आल्याचं दिसून येतंय.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani radhika merchant sangeet famous actors daughter hugged justin bieber while performing dvr
Show comments