scorecardresearch

“कुंकू पण पांढऱ्या रंगाचं लावायचं होतं”, लग्नातील ‘त्या’ व्हिडीओमुळे अनन्या पांडेच्या बहिणीवर नेटकरी संतप्त, म्हणाले “बॉलिवूडमुळे…”

अनन्या पांडेच्या बहिणीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

ananya panday sister alanna panday troll
अनन्या पांडेच्या बहिणीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण अलानाचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. अलानाने बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रेसह मुंबईत लग्नगाठ बांधली. अलानाच्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

अलाना व तिचा बॉयफ्रेंड आयव्हरने लग्नासाठी पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना पसंती दर्शविली. अलानाने भरजरी लेहेंगा परिधान केला होता. खड्यांच्या ज्वेलरीने तिने खास लूक केला होता. तर मॅक्रेने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान करुन डोक्यावर फेटाही बांधला होता. देसी लूकमध्ये मॅक्रेही राजबिंडा दिसत होता. लग्नात पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्यामुळे अलानाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> Video: “सात समुंदर…” गाण्यावर अनन्यासह थिरकले चंकी पांडे, बापलेकीच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>>‘द नाईट मॅनेजर’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याने आदित्य रॉय कपूरला केला व्हिडीओ कॉल, पोस्ट शेअर करत म्हणाला…

‘इन्संट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन अलानाच्या लग्नातील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हि़डीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत “बॉलिवूड सेलिब्रिटी लाल रंगाच्या लेहेंग्यावरुन पांढऱ्या रंगावर आले. यांच्यामुळे संस्कृती खराब होत आहे”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “ही इंग्लिश संस्कृती आहे” अशी कमेंट केली आहे. “पंडीत कुठे आहे?” असंही एकाने म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने “कुंकू पण पांढऱ्या रंगाचं लावायचं होतं” असं म्हणत ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> “चांगला माणूस पण वाईट…” सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने कॉमेडियन कपिल शर्माबाबत केलेलं विधान चर्चेत

अलाना पांडेच्या लग्नात अनन्या व चंकी पांडे यांनी खास डान्स केला. ‘सात समुंदर पार मे तेरे’ या गाण्यावर अनन्या व चंकी पांडे थिरकताना दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 17:30 IST
ताज्या बातम्या