बॉलिवूडचे स्टार किड्स सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यातलीच एक म्हणजे अनन्या पांडे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. अनेकदा आपल्या बोल्ड लूकमुळे ती चर्चेचा विषय ठरत असते. पण आता मात्र एका वेगळ्याच कारणाने सर्वांचं लक्ष तिच्याकडे वळलं आहे. याचं कारण म्हणजे बहिणीच्या मेहंदीच्या कार्यक्रमात अनन्या सिगारेट ओढताना दिसली.
अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे लवकरच विवाहबद्ध होत आहे. आता तिच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. कालच तिचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कऱ्यक्रमाचे इनसाइड फोटोज सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यात अनन्या पांडेचा सिगारेट ओढतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला होता तिथून तो डिलीट करण्यात आला आहे. पण याच दरम्यान या पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : “इस्लाम धर्माची थट्टा…” ‘त्या’ व्हिडीओमुळे राखी सावंत झाली ट्रोल

अनन्याने तिच्या बहिणीच्या मेहंदीमध्ये बेबी गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि त्यावर क्रॉप टॉप परिधान केला होता. या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये अनन्याच्या आजूबाजूला पाहुणे दिसत असून ती एका कोपऱ्यात सिगारेट ओढताना दिसत आहे. आता तिचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : Video: ड्रेसचा पट्टा घसरला अन्…अनन्या पांडेची भर कार्यक्रमात फजिती
हा मेहंदीचा कार्यक्रम सोहेल खानच्या घरी पार पडला. या कार्यक्रमात सलमान खानची आई सलमा खान आणि हेलनही पोहोचल्या होत्या. सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री, बॉबी देओल आणि त्याची पत्नी आणि अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप देखील आली होती.