scorecardresearch

अनिल कपूर यांची जितेंद्र जोशीसाठी खास पोस्ट, ट्वीट करत म्हणाले…

अनिल कपूर यांनी जितेंद्र जोशीसाठी केलेली पोस्ट चर्चेत

अनिल कपूर यांची जितेंद्र जोशीसाठी खास पोस्ट, ट्वीट करत म्हणाले…
जितेंद्र जोशीसाठी अनिल कपूर यांची खास पोस्ट. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. मे २०२२ मध्ये त्यांचा ‘थार’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. याच चित्रपटात मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीही झळकला होता.

थार या चित्रपटाला फिल्मफेअर ओटीटी अवॉर्डमध्ये नामांकन मिळालं आहे. जितेंद्र जोशीने या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात साकारलेल्या ‘पन्ना’ या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या प्रकारात त्याला नामांकन मिळालं आहे.

हेही वाचा >> Video: वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर शिल्पा तुळसकरचा रोमान्स; वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसली इंटिमेट सीनची झलक

अनिल कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन जितेंद्र जोशीचा फोटो पोस्ट करत ट्वीट केलं आहे. “वोट करा” असं म्हणत त्यांनी जितेंद्रला अवॉर्डसाठी मतदान करण्याची मागणी चाहत्यांना केली आहे. अनिल कपूर यांनी केलेलं हे ट्वीट चर्चेत आहे. जितेंद्र जोशीसाठी अनिल कपूर यांनी केलेल्या ट्वीटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा >>राणादा-पाठकबाईंच्या रिसेप्शन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला अन्…; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

हेही पाहा >>Photos: अर्जुन कपूरच्या बाळाची आई होण्याबाबत मलायका अरोरा स्पष्टच बोलली, म्हणाली “आम्ही याचा विचार…”

अनिल कपूर यांनाही या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता यासाठी नामांकन मिळालं आहे. त्यांनी जितेंद्र जोशीबरोबरच चित्रपटातील नामांकन मिळालेल्या इतर कलाकारांचे फोटोही ट्वीट करत मत देण्याची विनंती चाहत्यांना केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 10:16 IST

संबंधित बातम्या