Anil Kapoor Sunita Kapoor Honeymoon Secret Revelation: बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता अनिल कपूर सध्या ‘इंडिया के टॉप 1%’ शोचे सूत्रसंचालन करत आहे. या ओटीटी शोमध्ये एका स्पर्धकाशी संवाद साधताना अनिल कपूर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. अनिल कपूर यांच्या पत्नी सुनीता कपूर या एकदा एकट्याच हनिमूनला गेल्याचा खुलासा स्वतः अनिल कपूर यांनी केला आहे.
शोमध्ये २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘क्वीन’ सिनेमाचा उल्लेख करण्यात आला. कंगना रणौत यांच्या सिनेमाचा विषय निघताच अनिल कपूर यांनी पत्नी सुनीता यांच्याबाबत खुलासा केला. ‘क्वीन’ सिनेमाप्रमाणे सुनीता कपूर या सुद्धा एकट्याच हनिमूनला गेल्याचा मजेशीर किस्सा त्यांनी सांगितला. अनिल कपूर म्हणाले, “सुनीता एकटी हनिमूनला गेली होती, मी तिच्याबरोबर गेलो नव्हतो.” यानंतर अनिल कपूर पत्नीबद्दल प्रेम व्यक्त करत म्हणाले, “सुनीता हीच माझी राणी (क्वीन) आहे आणि कायम राहील.”
लग्नाआधी पत्नी सुनीताने अनिल कपूर यांच्यासमोर ठेवलेली ‘ही’ अट
पुढे अनिल कपूर यांनी लग्नापूर्वी सुनीता यांनी ठेवलेल्या एका अटीबद्दल सांगितले. लग्नानंतर कधीच त्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवणार नाहीत, अशी अट घातल्याचा खुलासा अनिल कपूर यांनी केला. ते म्हणाले, “लग्नाआधी सुनीताने एक अट घातली होती की, स्वयंपाकघरात जावे लागणार नसेल तरच ती माझ्याशी लग्न करेल. तिची ही अट ऐकल्यावर मला वाटले की मी खूप मेहनत करून इतके यशस्वी झाले पाहिजे की, तिच्यावर कधी स्वयंपाकघरात जाण्याची वेळ येणार नाही. मी ती जबाबदारी स्वीकारली आणि आजतागायत सुनीता स्वयंपाकघरात गेलेली नाही.”



‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनिल कपूर यांनी सुनीता यांच्याशी कशी ओळख झाली याबद्दल सांगितले. ते म्हणालेले, मला ज्या काळात सुनीता भेटली, तो माझा खूप संघर्षाचा काळ होता. त्याचवेळी तिचे मॉडेलिंगमध्ये खूप चांगले करिअर सुरू होते. ती एका बँक अधिकाऱ्याची लेक होती. सुनीताने मला ‘प्रँक कॉल’ करण्यासाठी मैत्रिणीकडून नंबर घेतला होता, पण त्यानंतर आमच्यामध्ये चांगली मैत्री झाली. नंतर आम्ही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली.”
