scorecardresearch

Premium

Animal Teaser : रणबीर कपूरचे हिंस्त्र रुप, जबरदस्त अ‍ॅक्शन अन्…; बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Animal Teaser

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे.

अ‍ॅनिमल या चित्रपटाच्या टीझरमध्ये भरपूर अॅक्शन पाहायला मिळत आहे. या टीझरची सुरुवात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यावेळी रश्मिका ही रणबीरच्या वडिलांचा विषय काढते आणि तो चिडतो. यानंतर या चित्रपटात रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारणारे अनिल कपूर पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा : Video : “स्वप्न खरी होतात…”, ‘वहिनीसाहेब’ धनश्री काडगावकरने ठाण्यात खरेदी केली दोन घरं, व्हिडीओत दाखवली झलक

pankaj-udhas
पंकज उधास यांची पत्नी फरीदा यांनी त्यांच्या पहिल्या अल्बमसाठी ‘अशी’ केलेली पैशांची जमवा जमव
prashant damle launches marathi ticket booking app name ticketalay
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त प्रशांत दामलेंची मोठी घोषणा! मराठमोळ्या ‘तिकिटालय’ ॲपचा शुभारंभ, जाणून घ्या…
bobby-deol-animal2
“मी जेव्हा ते पात्र साकारलं…”, ‘अ‍ॅनिमल’मधील नकारात्मक पात्राबद्दल बॉबी देओल स्पष्टच बोलला
vivek oberoi says akshay kumar helped him get work
“अक्षय कुमार अर्ध्या तासात घरी आला अन्…”, विवेक ओबेरॉयने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाला, “बॉलीवूडमध्ये बहिष्कार…”

यात अनिल कपूर हे रणबीरला मारताना दिसत आहेत. यानंतर रणबीर कपूरची दाढी, मिशी आणि केस वाढलेला लूक पाहायला मिळतो. तर या टीझरच्या शेवटी बॉबी देओलचा शर्टलेस लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर पहिल्यांदाच हिंस्त्र पात्र साकारताना दिसत आहे.

संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित हा चित्रपट याआधी ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. त्यानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या तारखेत बदल केला. आता हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तामिळ अशा पाच भाषेत प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : “लालबागचा राजा, मुंबईचा राजा किंवा दुसरा बाप्पा हा एकच…” नम्रता संभेरावचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाली “आतासारखे सेलिब्रिटी स्टेट्स…”

या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, परिणीती चोप्रा, बॉबी देओल, सौरभ शूक्लासारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना ही जोडी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Animal teaser ranbir kapoor anil kapoor share a toxic father son bond watch see detalis nrp

First published on: 28-09-2023 at 11:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×