Anju Bhavnani : अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नुकतीच ती तिच्या तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन पुन्हा सासरी परतली. लेक घरी परतल्याने रणवीर सिंह आणि आजी अंजू भवनानी यांना मोठा आनंद झाला आहे. दुआ घरी आल्यानंतर आनंद व्यक्त करत आजी अंजू यांनी नातीसाठी एक खास गोष्ट केली आहे. त्यामुळे आजी आणि नात दोघीही सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची मुलगी दुआचा जन्म ८ सप्टेंबर २०२४ ला झाला. ८ डिसेंबरला दुआ तीन महिन्यांची झाली आहे. तीन महिन्यांच्या लेकीसह दीपिका पुन्हा सासरी आली, त्यामुळे तीन महिन्यांच्या तिच्या वाढदिवसानिमित्त आजी अंजू यांनी तिला आशीर्वाद देत केस दान केले आहेत. त्यांनी केस दान करतानाचे काही फोटो आणि एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Dhanashree Verma break silence on Divorce Rumours
Dhanashree Verma : युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्री वर्माचे ट्रोल्सना चोख उत्तर; म्हणाली, “माझे मौन हे…”

हेही वाचा : करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर

अंजू भवनानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट केले आहेत. त्यांचे अकाउंट खासगी आहे. मात्र, काही पापाराझींनी त्याचे स्क्रिनशॉट काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. दुआ तीन महिन्यांची झाल्याने अंजू यांनी या पोस्टमध्ये तिला तीन महिन्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच केस दान केल्याचे फोटो पोस्ट केलेत. यातील पहिल्या फोटोत त्यांनी केसांच्या काही भागाची वेणी घातली आहे व कॅप्शनमध्ये ‘दान’, असं लिहिलं आहे. दुसऱ्या एका फोटोत त्यांनी दान केलेल्या वेणीची उंची एका पट्टीच्या मदतीने मोजली आहे. या फोटोवरसुद्धा, ‘दान’, अशी कॅप्शन दिली आहे.

त्यानंतर पुढे आणखी एका फोटोमध्ये केस दान केल्यानंतर त्यांनी सुंदर हेअरकट केला आहे. पुढील फोटोत एक पोस्ट आहे. यात अंजू यांनी लिहिलं, “दुआ बाळा, तुला तीन महिन्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, हा सुंदर दिवस प्रेमाने साजरा करूया. आम्ही जसजसे दुआ मोठी होतानाचा आनंद साजरा करत आहोत, तसतसे आम्हाला दयाळू, सकारात्मकता जाणवत आहे. आशा आहे की, माझं हे छोटंसं कार्य कठीण काळातून जात असलेल्या एखाद्या व्यक्तीला मदत करेल”, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दीपिका लेकीसह नुकतीच मुंबईत आली आहे. त्याआधी काही महिने ती बंगळुरूमध्ये होती. येथे तिने काही दिवसांपूर्वीच गायक दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या व्हिडीओसह ती लेकीला घेऊन मुंबईत आली, तेव्हा विमानतळावरील व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : ‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत

दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आजवर बॉलीवूडला तिने अनेक प्रसिद्ध आणि हिट चित्रपट दिले आहेत. ‘सिंघम अगेन’ चित्रपटात ती शेवटची दिसली होती. लवकरच ती पुन्हा एकदा तिच्या आगामी चित्रपटातील शूटिंगच्या कामांना सुरुवात करणार आहे.

Story img Loader