अभिनेत्री अंकिता लोखंडेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. अंकितानं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबरोबरचे फोटो शेअर करीत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Emergency Movie Cuts
Emergency : भिंद्रनवाले-संजय गांधींमधील संवाद ते शिखेतरांवरील…, कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात CBFC ने सुचवले ‘हे’ आठ बदल
sridevi wanted to work with amar singh chamkila
दिवंगत श्रीदेवींना ‘या’ लोकप्रिय गायकासह करायचा होता चित्रपट, हिंदी शिकवण्याची ऑफरही दिलेली पण…
Aishwaraya Narkar
Video: “खूप भारी दिसते तू…”, सूरज चव्हाणचा डायलॉग आणि ‘सैराट’ चित्रपटातील गाणं ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओनं नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष
Chhaya Kadam
“मी सावळी आहे हे…”, कान महोत्सव गाजवणाऱ्या छाया कदम स्वत:च्या दिसण्याविषयी म्हणाल्या, “इंडस्ट्रीमध्ये जी माणसं…”
Prajkata Mali
“अत्यंत स्वाभिमानी…”, प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’विषयी खुलासा; म्हणाली, “पुण्यात आल्यावर शास्त्रीबुवांचा परीसस्पर्श…”
Vandana Gupte
गणेशोत्सवात अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रेक्षकांसाठी खास भेट; ‘पार्वती नंदना’ अल्बम प्रदर्शित होताच म्हणाल्या, “आपल्या नातवाला…”

सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा कायमच आदर करतात. एकदा तरी भन्साळी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी, असं बऱ्याच कलाकारांचं स्वप्न असतं. याच पार्श्वभूमीवरअभिनेत्री अंकिता लोखंडेनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अंकितानं तिचा पती विकास जैन आणि संजय लीला भन्साळी यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत अंकिता लिहिते, “आदरणीय संजय सर, या क्षणी मी खूपच भारावून गेली आहे. मला आता जे काही वाटतंय , ज्या काही भावना माझ्या मनात दाटून आल्या आहेत, त्या व्यक्त करण्यासाठी शब्ददेखील अपुरे पडत आहेत. तुमची तुमच्या कामाप्रति असलेली निष्ठा, तुमचा दृष्टिकोन, आतापर्यंतचा तुमचा या इंडस्ट्रीतला प्रवास या सगळ्यामुळे मला तुमच्याकडून काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.”

हेही वाचा-Video : भावाच्या रक्षणासाठी काहीही, आलिया भट्टच्या बहुचर्चित ‘जिगरा’चा टीझर ट्रेलर प्रदर्शित; स्टंट्स आणि अ‍ॅक्शन…

“आज वेळात वेळ काढून भेटल्याबद्दल आणि माझ्याशी संवाद साधल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद! आजचा हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. तुमचं मिळणारं मार्गदर्शन आणि तुमचा माझ्यावर असलेला विश्वास या सगळ्यामुळे माझ्यातली अभिनेत्री आकार घेत आहे. याबद्दल मी तुमची कायम ऋणी आहे. या इंडस्ट्रीत स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवणं वाटतं तितकं सोपं नाही, पण माझ्या प्रतिकूल परिस्थितीत तुमचे विचार मला पुढे जाण्यासाठी प्रभावित करतात. संजय सर, मला तुमचा खूप जास्त अभिमान वाटतो”, अशा शब्दांत अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनं सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर अभिनेता संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट करीत, “संदीप तू, नेहमी माझ्या पाठीशी कायम असतोस. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार!”, अशा शब्दांत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा-शाहरुख खानच्या घरच्या बाप्पाला पाहिलंत का? अभिनेत्याने फोटो शेअर करत दिल्या चाहत्यांना शुभेच्छा; म्हणाला, “आपल्या सर्वांना…”

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात अंकिता झळकणार आहे का? याबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यात आहे. तिनं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.