Ankita Lokhande wearing hijab : मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे ही पतीसह अबुधाबी फिरण्यास गेली आहे. अंकिता लोखंडे आणि विक्की जैन हे एकत्र अरब देश फिरण्याचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करून आपल्या ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो अंकिता आणि विकीच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत, मात्र यातील एका फोटोवरून अंकिताला ट्रोल केले जात आहे. अरब देशांमध्ये जाऊन अंकिताने हिजाब परिधान केलेले नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले नाही. हिजाब घातल्यामुळे आणि मशिदीत गेल्यामुळेही नेटकऱ्यांनी अंकिता लोखंडेला ट्रोल केले आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर तिचे फिरण्याचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने पती विकीसह अरब देशातील विविध शहरांना भेट दिली आहे. ‘वॉर्नर ब्रदर्स वर्ल्ड’ या अबुधाबीमधील एक प्रसिद्ध इनडोअर थीम पार्कला त्यांनी भेट दिली. तसेच मशिदीला भेट दिली आहे. याचे खास फोटो अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
नेटकऱ्यांनी केले अंकिताला ट्रोल
या फोटोला कॅप्शन लिहित अंकिताने लिहिले की, माझ्या कॅमेऱ्यातून अबुधाबीचे काही क्षण. फिरणे, हसणे आणि आठवणी जपणे, असे लिहित अंकिताने फोटो शेअर केले आहेत. मात्र, काही नेटकऱ्यांना तिचे हिजाब घालणे आवडलेले नाही.
हिजाब घातल्याने नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
एका मशिदीला भेट देताना अंकिताने ब्लू जीन्स आणि लाल व पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला होता. यावर तिने स्कीन कलरचे हिजाब परिधान केले होते. अरब देशामध्ये गेल्यामुळे तिने हा लूक केला असला तरी नेटकऱ्यांनी तिला यावरून ट्रोल केले आहे. इन्स्टाग्रामवर नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, जैन असून हिजाब घातला आहे. याची काय गरज आहे. सेक्युलर होण्याची हौस तुम्हाला डुबवणार आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, मुली धर्मनिरपेक्ष हिंदू असल्याचा आव आणून काहीही करत आहेत. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, तुझा याच्याशी काहीही संबंध नाही, यापुढे प्लीज कधीही हिजाब घालू नकोस. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, कीव येते अशा मराठी लोकांना बघून, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडे हिने गोसेवा करीत गाईंबद्दलचे प्रेम व्यक्त केले होते. बेंगळुरू येथील गोशाळेला भेट देत अंकिता व विक्कीने गोसेवा केली होती. यावेळी नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले होते. आता मात्र अबुधाबीमध्ये हिजाब घातल्यामुळे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
