scorecardresearch

दुसऱ्या पत्नीशी पहिलीसाठी विश्वासघात, ६५व्या वर्षी बोल्ड सीन अन् प्रियांका चोप्राबरोबर…; अभिनेते अन्नू कपूर यांचे वादग्रस्त किस्से

अन्नू कपूर हे त्यांच्या अभिनयाइतकेच वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले.

annu kapoor birthday
(फोटो – इंडियन एक्सप्रेस)

अन्नू कपूर हे एकेकाळचा हिट शो ‘अंताक्षरी’च्या वृत्तनिवेदनामुळे ओळखले जातात. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कामही केलं आहे. अन्नू कपूर हे त्यांच्या अभिनयाइतकेच वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले. आज अन्नू कपूर यांच्या ६७व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दलचे काही किस्से जाणून घेऊयात.

अन्नू कपूर यांचं बालपण


अन्नू कपूर यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. त्यांचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थिती गेलं. सुरुवातीला त्यांना अभिनेता नव्हे तर आयएएस व्हायचं होतं. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ते आयएएस बनू शकले नाहीत. मग त्यांनी चहाची टपरी सुरू केली आणि उदरनिर्वाह केला. याशिवाय लॉटरीची तिकिटंही त्यांनी विकली होती.

‘पठाण’ची जादू कायम! जगभरात कमावले १००० कोटी; तर, भारतात चित्रपटाच्या कमाईचा आकडा तब्बल ‘इतके’ कोटी

अन्नू कपूर यांनी केली दोन लग्नं

अन्नू कपूर यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप चढ-उतार आले. त्यांची पत्नी अनुपमा अमेरिकन आहे. त्यांनी १९९२ मध्ये लग्न केलं होतं, पण वर्षभरातच त्यांच्यात वाद होऊ लागले, अशातच अन्नूंच्या आयुष्यात अरुणिताची एंट्री झाली. अन्नू यांनी अनुपमाला घटस्फोट देत अरुणिताशी लग्न केलं आणि मुलगीही झाली. पण नंतर मात्र त्यांना पहिल्या पत्नीवर प्रेम जडलं, ते तिला लपून भेटू लागले. अरुणिताला त्यांच्यावर संशय आला आणि एकेदिवशी तिला सत्य समजलं.

Video: आधी तक्रार दिली अन् आता तुरुंगात राखी सावंतने घेतली पतीची भेट; म्हणाली, “आदिल माझ्याशी खूप…”

सत्य समजल्यानंतर अरुणिताने अन्नू कपूरपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २००५ मध्ये अन्नूचा दुसऱ्यांदा घटस्फोट झाला. अरुणितापासून विभक्त झाल्यानंतर अन्नू यांनी २००८ मध्ये पहिली पत्नी अनुपमाशी पुन्हा लग्न केलं.

प्रियांका चोप्राशी वाद

‘सात खून माफ’ या चित्रपटात अन्नू कपूर यांनी प्रियांका चोप्राच्या सात पतींपैकी एकाची भूमिका केली होती. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असं काही घडलं की नंतर त्याचं रुपांतर वादात झालं. प्रियांका चोप्राने अन्नूबरोबर एक इंटिमेट सीन करण्यास नकार दिल्याचं अन्नू कपूरनी सांगितलं आणि हा वाद सुरू झाला. मी दिसायला चांगला नाही किंवा हिरो नाही, त्यामुळे प्रियांकाने इंटिमेट सीन करण्यास नकार दिल्याचं अन्नू म्हणाले होते. त्यानंतर बराच काळ दोघांमध्ये वाद रंगला होता.

Video: तुरुंगात आदिलची भेट घेतल्यानंतर राखीने घातला हिजाब; नमाज पठण करतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

६५ व्या वर्षी दिलेले बोल्ड सीन

अन्नू कपूरनी आपल्या कारकिर्दीत अल्ट बालाजीच्या ‘पौरुषपूर’ नावाच्या सीरिजमध्ये खूप बोल्ड सीन दिले होते. त्यांनी त्यांच्यापेक्षा अनेक वर्षांनी लहान असलेल्या महिला कलाकारांबरोबर इंटिमेट सीन शूट केले होते. यानंतर अन्नूकडे गंभीर अभिनेता म्हणून पाहण्याचा चाहत्यांचा दृष्टिकोनही बदलला होता. वयाच्या ६५ व्या वर्षी अन्नू कपूरनी दिलेले बोल्ड सीन पाहून अनेकांना धक्का बसला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 12:19 IST