या वर्षाची सुरुवात हिंदी चित्रपटांसाठी खास ठरली नसली तरी या वर्षाचा शेवटी बॉलिवूडच्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘उंचाई’ या चित्रपटाने अनपेक्षितपणे बॉक्स ऑफिसवर कामगिरी केली. या चित्रपटात अनुपम खेर, अमिताभ बच्चन, बोमन इराणी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या पाठोपाठ अजय देवगणचा ‘दृश्यम २’ चित्रपटगृहात धडकला.

‘दृश्यम २’ने ही जबरदस्त कमाई करत बॉलिवूडवर पसरलेली मरगळ दूर करायचा प्रयत्न केला. केवळ ३ दिवसांतच ‘दृश्यम २’ या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे आणि लवकरच तो २०० कोटींचा आकडादेखील पार करेल. याच निमित्ताने या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा : वेटर, फोटोग्राफर ते बॉलिवूड स्टार; ४२ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या बोमन इराणी यांचा थक्क करणारा प्रवास

चित्रपटसृष्टीतील बरीच मंडळी या पार्टीत हजर होती. अनुपम खेर यांनीदेखील या पार्टीत हजेरी लावली आणि चित्रपटातील कलाकारांचे अभिनंदन केले. अनुपम यांनी ‘दृश्यम २’च्या टीमबरोबर फोटोदेखील काढले. हे फोटो अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेयर केले आणि लिहिले, “दृश्यम २ ने यशाचं जी उंच शिखर गाठलं आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मी त्यांच्या आनंदात सहभागी झालो याचा मला आनंद आहे. चांगले चित्रपटात चालतात, भरपूर चालतात.”

अशापद्धतीने ट्वीट करत बॉलिवूडमध्ये टिपिकल चित्रपट बनवणाऱ्यांची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या ट्वीटला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘उंचाई’च्या आधी अनुपम खेर ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात झळकले होते, आता ते कंगनाच्या ‘एमर्जन्सि’ या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.