scorecardresearch

Video: अनुपम खेर व नर्गिस फाखरी यांनी मुंबईच्या डबेवाल्यांना वाढलं जेवण, व्हिडीओ व्हायरल

अनुपम खेर यांचा मुंबईच्या डबेवाल्यांना जेवण वाढतानाचा व्हिडीओ व्हायरल

anupam kher video
अनुपम खेर व नर्गिस फकरीचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड कलाकरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अनुपम खेर, नर्गिस फाखरी, नीना गुप्ता व शरीब हाशमी यांच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन अनुपम खेर, नर्गिस फाखरी, नीना गुप्ता व शरीब हाशमी यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी मुंबईच्या डबेवाल्यांना जेवण वाढताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> विशाखा सुभेदारच्या डान्स व्हिडीओवर गणेश आचार्यांची कमेंट, अभिनेत्रीने भारावून शेअर केली पोस्ट, म्हणाली…

हेही वाचा>> Video: मन्नतबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी, शाहरुख खान व्हिडीओ शेअर करत म्हणाला “पठाणच्या घरी…”

काहींनी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी हे चित्रपटाचं प्रमोशन असल्याचं म्हटलं आहे. “चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी काय काय करावं लागतं”, असं एकाने कमेंट करत म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “जेवढं वाढलं आहे त्यापेक्षा जास्त प्रमोशन करुन घेतलं आहे”, असंही एकाने म्हटलं आहे.

हेही वाचा>> “देशाने फक्त खान आणि मुस्लीम अभिनेत्री…”, कंगना रणौतने ‘पठाण’वरुन केलेल्या ट्वीटला उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “हिंदू कलाकार…”

अनुपम खेर, नर्गिस फाखरी, नीना गुप्ता व शरीब हाशमी यांचा ‘शिव शास्त्री बाल्बोआ’ हा चित्रपयट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये हे कलाकार सध्या व्यग्र आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 18:21 IST