अनुराधा पौडवाल या मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय गायिका आहेत. आपल्या सुमधुर आवाजाने त्यांनी लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या यशस्वी कारकिर्दीत असंख्य गाजलेल्या गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. अनुराधा पौडवाल यांनी १९७३ साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘अभिमान’ या चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण केले.

हेही वाचा- “आपण इतके मुर्ख…”; ‘कान्स’मधील ऐश्वर्या रायचा लूक बघून विवेक अग्निहोत्री भडकले, ट्वीट करत म्हणाले…

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

एका मुलाखतीत, अनुराधा पौडवाल यांनी जुन्या हिंदी गाण्यांचे रिमिक्सिंग आणि रिक्रिएट करण्याच्या ट्रेण्डवर भाष्य केलं आहे. गायक अरिजित सिंगच्या ‘आज फिर तुम पे’ या गाण्यावर अनुराधा पौडवाल यांनी दिलेली प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे. ‘दयावान’ सिनेमातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं ‘आज फिर तुम पे’चं रिमिक्स व्हर्जन अरिजित सिंहने गायलं होतं.

हेही वाचा- “तुम्ही सॉफ्टवेअर उद्योजक आणि ती…” पतीबरोबर फ्लाईटमध्ये घडलेल्या ‘त्या’ घटनेवर सुधा मूर्तींनी केलेले भाष्य, म्हणाल्या “सिनेसृष्टीतील कलाकारांचे…”

त्या गाण्यावर अनुराधा पौडवाल म्हणाल्या, “एकदा एका व्यक्तीने मला ‘दयावान’मधील ‘आज फिर तुम पे’ गाण्याचं रिमिक्स ऐकण्यास सांगितलं. त्या व्यक्तीने मला सांगितलं की हा एक सुपर-डुपर हिट ट्रॅक आहे. जेव्हा मी ते रिमिक्स ऐकलं तेव्हा मला अश्रू अनावर झाले. मी लगेच यूट्यूबवर जाऊन माझं मूळ गाणं अनेक वेळा ऐकलं. तेव्हा कुठं माझ्या मनाला समाधान मिळालं.”

हेही वाचा- ‘या’ प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने फक्त १.५ लाखांत केलेलं स्वतःचं लग्न, लेहेंग्याची किंमत होती फक्त…

अनुराधा पौडवाल यांनी १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अभिमान’ या हिंदी चित्रपटातून आपल्या गायनाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. प्रख्यात संगीत दिग्दर्शक एस. डी. बर्मन यांनी चित्रपटाला संगीत दिले होते. ‘भक्तिगीतापासून ते धक धक…’सारखे गाणे त्यांनी गायलं आहे. आत्तापर्यंत अनुराधा पौडवाल यांनी मराठी आणि हिंदीसोबत तमिळ, ओडिया, नेपाळी, बंगाली आणि कानडी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.