‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘ब्लॅक फ्रायडे’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार कलाकृती बनवणारा बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपला ओळखलं जातं. अनुराग उत्तम दिग्दर्शक आहेच पण, तो त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. अनुरागने आजवर अनेक मुलाखतींमध्ये आपली स्पष्ट मतं मांडत सेटवर अवाजवी मागण्या करणाऱ्या कलाकारांवर टीका केलेली आहे. सध्या दिग्दर्शक त्याच्या ‘बॅड कॉप’ सीरिजमुळे प्रचंड चर्चेत आहे.

अनुराग कश्यपने नुकत्याच जेनिस सिक्वेराला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या सेटवरील वाढत्या खर्चावर नाराजी व्यक्त केली आहे. कलाकारांनी प्रत्येक संसाधनांचा कशाप्रकारे विचार करून उपयोग करण्याची गरज आहे यावर दिग्दर्शकाने भाष्य केलं आहे. अनुराग कश्यप या मुलाखतीत सध्या सेटवर होणार्‍या वाढीव खर्चाबद्दल बोलले यावेळी त्याने नाव न घेता एका अभिनेत्याचा किस्सा सांगितला. संबंधित अभिनेत्याच्या कुकचा एका दिवसाचा पगार २ लाख रुपये आहे असंही त्याने सांगितलं.

हेही वाचा : Video : ‘येरे येरे पैसा ३’ मध्ये झळकणार ‘हे’ कलाकार, दिग्दर्शकासह एकत्र केला डान्स! चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

अनुराग कश्यप म्हणाला, “कोणाकडे तरी एक कुक आहे जो सकस आहार बनवण्यासाठी एका दिवसाचे तब्बल २ लाख रुपये घेतो. हे ऐकून मला वाटतं हे नक्की जेवण आहे की पक्ष्यांचं खाद्य आहे? तो कुक काय जेवण बनवतो हे मी पाहिलं आहे. एकदी कमी प्रमाणात पीठ मळून ठेवलं होतं. ते पीठ म्हणजे पक्ष्यांसाठी चारा ठेवल्यासारखं मला वाटलं.”

हेही वाचा : Video : मराठमोळ्या ऋतुजा बागवेचा हिंदी अभिनेत्यासह ‘पुष्पा’ स्टाइल जबरदस्त डान्स! ‘सूसेकी’ गाण्यावर थिरकले

“मी फक्त याच पद्धतीचा आहार घेतो, मला एलर्जी आहे अशा अनेक गोष्टी कलाकारांकडून मी ऐकलेल्या आहेत” असं अनुराग कश्यपने सांगितलं. अभिनेत्यांच्या मनमानी मागणीवर अनुरागने भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा एका स्टार अभिनेत्याने शूटिंगपासून काही तास दूर असलेल्या एका शहरातून खास हॅम्बर्गर आणला होता. यावेळी सुद्धा दिग्दर्शकाने नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा : Video : खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी-झहीरची लग्नाआधी घेतली भेट, होणाऱ्या जावयाला सर्वांसमोर मिठी मारली अन्…

दरम्यान, ‘बॅड कॉप’बद्दल सांगायचं तर, याच नावाने जर्मन भाषेत बनवलेल्या वेब सीरिजचं हे हिंदी रुपांतर आहे. यामध्ये अनुराग कश्यप खलनायकाची भूमिका साकारत आहे. प्रेक्षकांनी त्याने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.