विवेक अग्निहोत्री नेहमीच स्पष्टपणे त्यांची मतं मांडत असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ते चर्चेचा विषय ठरतात. अशातच आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी केलेल्या विधानांमुळे ते चर्चेत आले आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी अनुराग कश्यपबद्दल भाष्य केलं होतं.

विवेक अग्निहोत्री व अनुराग कश्यप यांनी २००७ साली आलेल्या ‘धन धना धन गोल’ या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. विवेक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्याबद्दल आता विवेक यांनी अनुरागबद्दल भाष्य केलं आहे. ‘डिजिटल कॉमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले, “आम्ही ‘धन धना धन गोल’ या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. सैफ अली खान व प्रियांका चोप्रा यांची यासाठी निवड करण्यात आली होती. परंतु, सैफला काही वैयक्तिक काम आल्यानं त्याला हा चित्रपट करता आला नाही. नंतर जॉन अब्राहम बिपाशा बासू यांची यासाठी निवड करण्यात आली”.

त्याबाबत बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, “अनुराग तेव्हा खूप मद्यपान करीत असे. त्यानं विक्रम मोटवानी याला त्याचं काम सोपवलं आणि म्हणाला की, हा खूप हुशार मुलगा आहे. हा माझा माणूस आहे.” पुढे विवेक अग्निहोत्री, “त्यांचा दृष्टिकोण माझ्यापेक्षा खूप वेगळा होता. निर्मात्यांसाठी अनुरागला सांभाळून घेणं अवघड झालं होतं”, असंही म्हणाले. अशातच आता यावर अनुराग कश्यपनं सोशल मीडियावर याबाबत मत व्यक्त केलं आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या आरोपांना उत्तर देत तो म्हणाला, “हा किती खोटा माणूस आहे. शूटिंग लंडनमध्ये झालं होतं आणि मी तेव्हा भारतात होतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“विक्रमनं लिहिलेली संहिता त्याला नको होती. त्याला फुटबॉलवर आधारित ‘लगान’सारखा चित्रपट बनवायचा होता. त्यामुळे त्यानं त्याच्या लेखकाकडून कथा लिहून घेतली. मी किंवा विक्रम दोघेही सेटवर नव्हतो”, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.