उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतचं राधिकाशी लग्न होणार आहे. १२ जुलै रोजी या दोघांचं लग्न मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होईल. याच ठिकाणी त्यांचा रिसेप्शन सोहळा होणार आहे. सध्या अनंत व राधिकाच्या लग्नाआधीचे काही समारंभ होत आहेत. अनंत व राधिकाच्या लग्नाला दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीने सर्कस म्हटलं आहे. पॉप स्टार जस्टिन बीबरने नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात हजेरी लावली. तब्बल ८३ कोटी रुपये मानधन घेऊन त्याने या संगीत सोहळ्यात परफॉर्म केलं. अंबानी आपल्या मुलाच्या लग्नात प्रचंड पैसा खर्च करून सगळे सोहळे करत आहेत. अशातच अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिने नुकतीच अनंत अंबानींच्या लग्नावर टीका केली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा प्रचार करण्यासाठी नावाजलेल्या लोकांना बोलावण्यात आल्याचं तिने म्हटलं आहे. हे लग्न म्हणजे सर्कस आहे आहे, असंही तिने नमूद केलं. “हा आमिर खानचा मुलगा आहे?” रिक्षामध्ये आलेल्या जुनैद खानला त्याच्याच सिनेमाच्या स्क्रीनिंगला अडवलं आलिया कश्यपने तिच्या ब्रॉडकास्ट चॅनलवर या लग्नाबद्दल कमेंट्स केल्या आहेत, त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. "आता अंबानीचे लग्न हे लग्न नसून सर्कस झालं आहे, मला काही इव्हेंट्ससाठी बोलावण्यात आलं होतं, कारण ते पीआर करत आहेत. पण मी नकार दिला कारण मला कोणाच्या तरी लग्नासाठी स्वतःला विकण्यापेक्षा जास्त स्वाभिमान आहे. श्रीमंत लोकांचं आयुष्य कसं असतं ना, अरे..माझ्याकडे पैसे जास्त आहेत, काय करावं. चला जस्टिन बीबरला बोलवू," अशा कमेंट्स आलियाने केल्या आहे. आलिया कश्यपच्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. (फोटो - सोशल मीडिया) Like Mother like Daughter! अमृता फडणवीस अन् लेक दिविजाचा Same to Same लूक, पाहा ग्लॅमरस फोटो आलिया कश्यपच्या या कमेंट्सचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. दरम्यान, अनंत अंबानी व राधिकाचा साखरपुडा २०२३ मध्ये झाला होता. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये तीन दिवस जामनगरमध्ये या जोडप्याचा पहिला प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या प्री -वेडिंगला बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तसेच आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना हिने परफॉर्म केलं होतं. https://www.instagram.com/p/C2rupqHNoKT/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== Video: अनंत-राधिकाच्या हळदीत अनिल अंबानींच्या सूनेवर खिळल्या नजरा, काय करते क्रिशा शाह? जाणून घ्या जून महिन्यात अनंत व राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीमध्ये पार पडला. क्रूझवर झालेल्या या प्री- वेडिंग सोहळ्याला रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर खान, दिशा पाटनी, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी अशा मोजक्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या प्री-वेडिंगमध्ये गुरू रंधावाने व आंतरराष्ट्रीय गायिका शकीरा हिने परफॉर्म केलं होतं. या दुसऱ्या प्री-वेडिंगचे व्हिडीओ खूप चर्चेत होते.