Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony : ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘सेक्रेड गेम’ फेम दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या घरी सध्या लगीनघाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनुरागची लाडकी लेक आलिया कश्यप येत्या काही दिवसांत विवाहबंधनात अडकणार आहे. या सोहळ्याची खास झलक दिग्दर्शकाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अनुराग कश्यपची ( Anurag Kashyap ) लेक आलिया कश्यप नेहमीच तिच्या हटके आणि बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून आलिया कश्यप तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. २०२३ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी आलियाने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरशी साखरपुडा केला होता. आता साधारण वर्षभराने हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे.

Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

हेही वाचा : Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने सांगितलेला अनुभव चर्चेत, “पांढऱ्या दाढीतील तो रहस्यमयी माणूस त्याने मला सांगितलं की…”

आलिया आणि शेन यांचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. या आधी दोघांच्या घरी लगीनघाईला सुरुवात झालेली आहे. यांचा हळदी सोहळा नुकताच पार पडला असून याची खास झलक अनुराग कश्यपने ( Anurag Kashyap ) इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. लाडक्या मैत्रिणीच्या हळदीला खुशी कपूर आणि दिग्दर्शक इम्तियाज अली यांची मुलगी इदा अली सुद्धा उपस्थित होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया कश्यपचा विवाहसोहळा ११ डिसेंबरला मुंबई येथील महालक्ष्मी रेसकोर्समध्ये पार पडणार आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल अनुराग कश्यपचा होणारा जावई नेमकं काय काम करतो तसेच हा शेन ग्रेगोयर नेमका आहे तरी कोण? याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…

हेही वाचा : राणादा अन् पाठकबाई पुन्हा एकत्र झळकणार? अक्षया देवधरच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चा, पाहा व्हिडीओ

अनुराग कश्यपचा होणारा जावई कोण आहे?

आलिया कश्यपचा होणारा नवरा शेन ग्रेगोयर आता २४ वर्षांचा असून तो अमेरिकन उद्योजक आहे. रॉकेट पॉवर्ड साउंड नावाच्या कंपनीचा तो संस्थापक आहे. ही सॉफ्टवेअर कंपनी साउंड डिझायनिंगचं काम करते. आलिया कश्यप आणि शेन लॉकडाऊनच्या काळापासून एकमेकांना डेट करत होते. यानंतर या जोडप्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मे २०२३ मध्ये शेनने आलियाला प्रपोज केलं होतं. यानंतर दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आलिया ही सध्या २३ वर्षांची असून व्यवसायाने युट्यूब व्लॉगर आहे.

Aaliyah Kashyap-Shane Gregoire
आलिया कश्यप आणि शेन ( Anurag Kashyap )

दरम्यान, आलिया आणि शेनच्या साखरपुड्याला खुशी कपूर, सुहाना खान, अगस्त्य नंदा, इब्राहिम अली खान, पलक तिवारी असे सगळे स्टारकिड्स उपस्थित होते. आता आलिया कश्यपच्या लग्नाला सुद्धा हे सगळेजण उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader