बॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपटनिर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप तिच्या बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. आलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता आलिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. अलीकडेच तिने तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरबरोबर साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकतच आलियाने तिच्या वजनाबाबात भाष्य केलं आहे.
हेही वाचा- ‘तुझे मेरी कसम’ ते ‘वेड’, रितेश-जिनिलीयाचा रोमॅंटिक व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, “दादा-वहिनी…”




आलिया म्हणाली, “हा वेडेपणा आहे आणि ही असुरक्षितता मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. मी नेहमीच बारीक होते पण माझी पचन क्रिया खूप चांगली होती. मला नेहमी वजन वाढवायचे होते. माझी हाडे खूप भीतीदायक होती. मी कितीही खाल्ले तरी माझे वजन वाढू शकले नाही आणि माझी आईही लहान असताना अशीच होती. म्हणून मला माहित आहे की मला ते वारशाने मिळालेले आहे.”
आलिया पुढे म्हणाली की, आता माझे वजन वाढले आहे पण मला यावर लोकांच्या कमेंट्सची गरज नाही. मला माझ्या वजनाची खूप काळजी वाटत होती आणि जेव्हा कोणी त्यावर कमेंट करत असे तेव्हा मला खूप वाईट वाटायचे मला वाटते मी. माझी हाडे खूप भीतीदायक होती. अजूनही माझ्या दिसण्याने आनंदी नाही आणि मी अजूनही असुरक्षित आहे. परंतु मला वाटते की मी आज निरोगी मानसिकतेत आहे.
लहान वयात लग्न करत असल्याचे म्हणत आलियाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगवर मौन सोडत आलियांनी नेटकऱ्यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. आलिया म्हणाली होती. “हे माझं आयुष्य आहे. आम्ही दोघेही लग्नासाठी तयार आहोत, आम्ही तीन वर्षे एकत्र आहोत. मला माहित आहे की मी या नात्यात खूप आनंदी आहे. मी लहान वयात लग्न करत आहे म्हणून लोक माझा द्वेष करत असतील तर त्याने मला काही फरक पडत नाही.”