बॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपटनिर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप तिच्या बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. आलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता आलिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. आलियाने २० मे रोजी तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरबरोबर साखरपुडा केला होता. आलियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. आता आलियाने तिच्या लग्नाच्या प्लॅन्सबाबत अनेक खुलासे केले आहेत.
हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहता येणार फक्त ९९ रुपयांत; जाणून घ्या कधी आणि कुठे?




आलिया तिच्या युट्यूब चॅनलवर तिचा होणारा नवरा शेन ग्रेगोयरबरोबर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. काही चाहत्यांनी तिला तिच्या साखरपुडा आणि लग्नाबाबत प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांना उत्तर देत आलिया म्हणाली, मी आणि शेन २०२५ साली लग्न करणार आहेत. कारण सध्या आम्हाला आमच्या साखरपुड्याचा आनंद घ्यायचा आहे.
लहान वयात लग्न करत असल्याचे म्हणत आलियाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगवर मौन सोडत आलियांनी नेटकऱ्यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. आलिया म्हणाली होती. “हे माझं आयुष्य आहे. आम्ही दोघेही लग्नासाठी तयार आहोत, आम्ही तीन वर्षे एकत्र आहोत. मला माहित आहे की मी या नात्यात खूप आनंदी आहे. मी लहान वयात लग्न करत आहे म्हणून लोक माझा द्वेष करत असतील तर त्याने मला काही फरक पडत नाही.”