प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्याच्या ‘प्यार विथ डीजे’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यादरम्यान दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या चित्रपटाबरोबरच खासगी आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अनुरागने सांगितलं की, तो डिप्रेशनच्या फेजमधून बाहेर पडला आहे. आता त्याने नुकत्याच एका मुलाखतीत दारूच्या व्यसनामुळे त्याचं कुटुंब कसं उध्वस्त झालं होतं हे सांगितलं. एकदा तर अनुरागला त्याच्या पत्नीने घरातून बाहेर काढलं होतं.
२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देव डी’ या चित्रपटामुळे अनुराग कश्यप चर्चेत आला होता. आपल्या आयुष्यातल्या सर्वात कठीण काळाबद्दल बोलताना तो म्हणाला, “माझे चित्रपट एका मागोमाग एक फ्लॉप होत होते. त्यामुळे मी नैराश्यात गेलो होतो. अशा परिस्थितीतून स्वतःला बाहेर पडण्यासाठी मी स्वतःला एका रुममध्ये बंद करून घेतलं होतं. तिथूनच माझ्या वाईट परिस्थितीची सुरुवात झाली होती.”
आणखी वाचा- अनुराग कश्यपच्या संघर्षाच्या काळात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केली मदत; मात्र ठेवली होती ‘ही’ अट
अनुराग पुढे म्हणाला, “मी खूप दारू प्यायचो. रात्रंदिवस मी फक्त विचार करत बसत असे. प्रमाणापेक्षा जास्त विचार आणि अति प्रमाणात दारू प्यायल्याने मी नैराश्यात गेलो होतो. जवळपास दीड वर्ष असंच सर्व चालत राहिलं. माझी पूर्वाश्रमीची पत्नी मला वैतागली होती. तिने मला लाथ मारुन घरातून बाहेर काढलं. त्यावेळी माझी मुलगी आलिया फक्त ४ वर्षांची होती. तो खूप कठीण काळ होता. मी नैराश्यात होतो. माझ्या डोक्यात फक्त राग भरलेला होता.”
आणखी वाचा- ‘सेक्रेड गेम्स ३’ येणार नाही; अनुराग कश्यपचं मोठं विधान, दिग्दर्शकाने स्पष्ट केलं यामागील कारण
दरम्यान अनुराग कश्यपच्या कामाबद्दल बोलायचं तर ‘दोबारा’ हा त्याचा अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर त्याचा ‘प्यार विथ डीजे’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री अलाया एफ आणि करण मेहता मुख्य भूमिकेत आहेत.