अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आता २ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. पण त्याच्या आत्महत्येची चर्चा काही ना काही कारणाने नेहमीच होताना दिसते. सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर या घटनेनं संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघालं होतं. अभिनेत्री आणि सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला यामुळे तुरुंगातही जावं लागलं. सुशांतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात ड्रग्स अँगलने बरीच खळबळ माजली होती. अर्थात नंतर हे प्रकरण थंडावलं असलं तरी आता पुन्हा एकदा दिग्दर्शक अनुराग कश्यपमुळे सुशांतच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात अनुराग कश्यप सध्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने अभिनेता अभय देओलबरोबर असलेल्या वादावर भाष्य केलं होतं. त्यानंतर आता त्याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अनुरागने एका मुलाखतीत सुशांतबरोबर झालेल्या वादानंतर त्यांच्याशी काम न केल्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला आहे.

vasai suicide marathi news
वसई: चित्रफित तयार करून तरुणाची आत्महत्या, पोलिसाने धमकी दिल्याचा चित्रफितीत आरोप
Dibakar Banerjee on Sushant Singh Rajput death
सुशांतसिंह राजपूतच्या जाण्याचं दुःख कुणालाच नाही, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे स्पष्ट मत; म्हणाले, “त्याच्या निधनानंतर शोकसभा…”
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

आणखी वाचा- ‘बॉयकॉट बॉलिवूड’वर दिग्दर्शक मधुर भांडारकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले “सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर…”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुरागने सुशांतबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, “सुशांतने आत्महत्या करण्याच्या ३ आठवड्यांपूर्वीच माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्याला काम हवं होतं. पण मी त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. कारण त्याच्याशी माझे संबंध फारसे चांगले नव्हते. पण मला आज याचा पश्चाताप होतोय. अर्थात हे सर्व समजून घेण्यासाठी मला दीड वर्ष गेलं की मी खूप लवकर प्रतिक्रिया देतो. मी आता बदललो आहे, मला समजलं आहे की प्रत्येक गोष्ट बोलून दाखवण्याची गरज नसते.”

दरम्यान २०२० मध्ये एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनुरागने सांगितलं होतं की, यशराज फिल्मबरोबर काम करण्यासाठी सुशांत सिंह राजपूतने त्याच्या चित्रपट सोडला होता. सुशांतने त्यावेळी अनुराग कश्यपचा चित्रपट नाकारून ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा चित्रपट साइन केला होता. याशिवाय पुढे एमएस धोनी प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा मुकेश छाब्रा यांनी सुशांतला अनुरागच्या चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं होतं. मात्र सुशांतने अनुरागला कॉल केला नव्हता.