अभिनेत्री व क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. इतकंच नव्हे, तर या दोघीही एकाच शाळेत होत्या. चेन्नई सुपरकिंग्सचे आयपीएलचा १६वा हंगाम जिंकला, त्यानंतर विजेत्या संघातील क्रिकेटपटू व त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो व्हायरल होत आहेत. अशातच साक्षी व अनुष्काचे शाळेतील फोटोही समोर आले आहेत.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कुणाच्या शपथविधीला बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं? राज ठाकरे म्हणाले…
अनुष्का आणि साक्षीचे त्यांच्या शाळेतील फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दोघी पोज देताना दिसत आहेत. अनुष्का शर्माचे वडील निवृत्त कर्नल अजय कुमार शर्मा हे आसाममध्ये तैनात होते तेव्हाचे हे फोटो आहे. तेव्हा अनुष्का तिथल्या सेंट मेरी स्कूलमध्ये शिकत होती. ही तीच शाळा आहे जिथून धोनीची पत्नी साक्षीनेही शिक्षण घेतले आहे.
अनुष्काने शिक्षणानंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, तर साक्षी धोनीने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास सुरू केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करत असताना तिची भेट धोनीशी झाली आणि त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांची प्रेम कहाणी ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातही पाहायला मिळाली होती.
एकदा अनुष्का शर्माने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते, “मी आणि साक्षी आसाममधील एका छोट्या शहरात राहत होतो. ती कुठे राहायची हे तिने सांगितल्यावर मीही तिथेच राहायचे असं सांगितलं. त्यानंतर आम्हाला एकमेकींच्या शाळेची नावं माहीत झाली. योगायोग असा की आम्हीच एकाच शाळेत शिकलो. यानंतर मला एक फोटो सापडला, ज्यामध्ये साक्षीने परीसारखा ड्रेस घातला होता, तर मी माझ्या आवडत्या माधुरी दीक्षितसारखा घाघरा परिधान केला होता.”
दोघींचे त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबरचे बरेच फोटो सोशल मीडियावर आहेत.
दरम्यान, दोघी एका शाळेत शिकल्या, त्यांचे एकत्र फोटोही आहेत, पण त्या एकाच वर्गात होत्या की नाही, याबाबत त्यांनी सांगितलं नाही. त्या दोघींचे बालपणीने फोटो मात्र अनेकदा व्हायरल होत असतात.