Anushka Sharma Net Worth : अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने २००८ मध्ये आलेल्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘बँड बाजा बारात’, ‘पिके’, ‘सुलतान’, ‘सुई धागा’ आणि ‘ए दिल है मुश्कील’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
गेल्या ८ वर्षांपासून ती मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही, तरीही ती कोट्यवधींची मालकीण आहे. आज अभिनेत्रीचा ३८वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पडद्यापासून दूर असलेल्या आणि गेली अनेक वर्षे चित्रपटांत न झळकलेली अनुष्का शर्माचा व्यवसाय आणि नेटवर्थ याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
अनुष्का शर्माची नेटवर्थ किती?
अनुष्का शर्मा चित्रपटात काम करत नसली तरी ती खूप आलिशान आयुष्य जगते. सध्या ती तिच्या दोन मुलांच्या संगोपनात व्यग्र आहे. तरीही अभिनेत्री कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार अनुष्काची एकूण संपत्ती सुमारे २५५ कोटी रुपये इतकी आहे.
ती चित्रपट, जाहिराती, तिचा कपड्यांचा ब्रँड नुश (Nush) आणि प्रोडक्शन कंपनी क्लीन स्लेट फिल्म यांमधून कमाई करते. एबीपीच्या वृत्तानुसार एका जाहिरातीसाठी ती अंदाजे ५ ते १० कोटी रुपये मानधन घेते. असं म्हटलं जातं.
अनुष्काकडे आहे कोट्यवधींची संपत्ती
मुंबईत तिचं सी-फेसिंग घर आहे, ज्याची किंमत सुमारे ३४ कोटी रुपये इतकी आहे. जुहूमध्ये तिचं एक अपार्टमेंटही आहे, ज्याचं मासिक भाडं सुमारे २.७६ लाख रुपये आहे.
अनुष्काकडे आहे आलिशान गाड्यांचं कलेक्शन
अनुष्काकडे रेंज रोवर वोग ही गाडी आहे, ज्याची किंमत २.५कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्या गॅरेजमध्ये रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी देखील आहे, ज्याची किंमत सुमारे २.७५ कोटी रुपये आहे. अनुष्काकडे Audi Q8 १.३४ कोटी रुपये आणि BMW 7 Series२.४६ कोटी रुपये सारख्या महागड्या गाड्याही आहेत.याशिवाय गुरुग्राममध्ये तिचा सुमारे ८० कोटी रुपयांचा बंगला आणि अलीबागमध्ये सुमारे १९ कोटी रुपयांचं फार्महाऊस आहे.अनुष्का एका चित्रपटासाठी साधारण ७ कोटी रुपये मानधन घेते. तसंच, ती एका इंस्टाग्राम पोस्टमधून जवळपास ९५ लाख रुपये कमावते.
