Anushka Sharma Real Estate Investment: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता अनुष्काने पालकांसह रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे.
अनुष्का शर्माने पालकांसह मुंबईत खरेदी केले अपार्टमेंट
रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म CRE मॅट्रिक्सने दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्मा आणि तिचे आई-वडील, आशिमा आणि अजय कुमार शर्मा यांनी मुंबईतील वर्सोवा येथे २५.८० कोटींना दोन अपार्टमेंट खरेदी केले आहेत. याची नोंदणी ८ जुलै २०२६ला झाली आहे.
कागदपत्रांनुसार, अनुष्का शर्माने २,१५३ चौरस फुटांचे एक अपार्टमेंट १४.८९ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. या व्यवहारासाठी तिने ७४.४७ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. या अपार्टमेंटबरोबरच तीन पार्किंगही आहेत.
याचबरोबर, अनुष्काचे आई-वडील, आशिमा आणि अजय कुमार शर्मा यांनी गोदरेज प्रॉपर्टीजच्या एका प्रोजेक्टमध्ये, आधीच्या अपार्टमेंटच्या मजल्यावर दुसरे अपार्टमेंट खरेदी केले. सुमारे १,५७७ चौरस फुटांचे हे अपार्टमेंट १०.९१ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. यासाठी त्यांनी ६५.४४ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले. कागदपत्रांनुसार, या अपार्टमेंटबरोबर दोन पार्किंगही आहेत.
२०२२ मध्ये अनुष्का शर्मा व विराट कोहलीने ८ एकरची जमीन खरेदी केली. त्यांनी १९ कोटींना ही जमीन खरेदी केली होती. त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
दरम्यान, विराट कोहली व अनुष्का शर्मा दोघेही सोशल मीडियावर कमी प्रमाणात सक्रिय असतात. मात्र, दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे दोघांचीही एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.
