Anushka Sharma Education : अनुष्का शर्मा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. पण मुलीच्या जन्मानंतर अनुष्कानं अभिनयातून ब्रेक घेतला. अभिनयाचं कोणतंही प्रशिक्षण न घेता, तिनं इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली; पण तुम्हाला माहीत आहे का अनुष्काचं शिक्षण किती आहे?
इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, जे उच्चशिक्षित आहेत; पण अभिनय क्षेत्रातील आवडीमुळे त्यांनी ही वाट धरली. त्यापैकीच एक म्हणजे अनुष्का शर्मा. उत्तर प्रदेश अयोध्यामध्ये जन्मलेल्या अनुष्कानं बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिचं शिक्षण पूर्ण केलं होतं. अनुष्काकडे डिग्रीसुद्धा आहे. अनुष्कानं बंगळूरुतील आर्मी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.
अनुष्का शर्माचं शिक्षण किती?
‘एबीपी’च्या वृत्तानुसार अनुष्कानं आर्मी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बंगळुरूतीलच माउंट कार्मेल कॉलेजमधून आर्टसमध्ये डिग्री घेतली आहे. अनुष्का इथेच थांबली नाही, तर तिनं उच्च शिक्षणसुद्धा घेतलं आहे. अभिनेत्रीनं आर्ट्समध्ये डिग्री घेतल्यानंतर इकोनॉमिक्समध्ये मास्टर करत डिग्री घेतली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्का मुंबईत आली आणि मॉडेलिंगमध्ये करिअर केलं.
अनुष्कानं २००८ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं शाहरुख खानच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटत काम करत पदार्पण केलं. तिनं यामधून पहिल्यांदाच शाहरुख खानबरोबर काम केलं होतं. दोघांची या चित्रपटातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यातील गाणी आजही अनेक जण ऐकत असतात. त्यानंतर अनुष्कानं ‘पीके’, ‘झिरो’, ‘सुलतान’ यांसारखे काही हिट चित्रपट दिले आहेत. सध्या ती मनोरंजन विश्वापासून दूर आहे.
अनुष्का सध्या व्यावसायिक आयुष्यापासून दूर असून, खासगी आयुष्यामध्ये व्यग्र आहे. अभिनेत्रीनं स्टार क्रिकेटर विराट कोहलीसह लग्न केलं असून, त्यांच्या वामिका व अकाय या दोन मुलांच्या जन्मानंतर तिनं इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला; पण अभिनेत्री अनेकदा तिच्या नवऱ्याच्या क्रिकेट मॅसेचला हजेरी लावत असते.
दरम्यान, अनुष्कानं शेवटचं माजी महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित ‘छकडा एक्स्प्रेस’मध्ये काम केलं. अद्याप तिचा हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यासह ती २०२२ मध्ये नेटफ्लिक्सच्या ‘काला’ चित्रपटातील ‘घोडे पे स्वान’ या गाण्यात झळकली होती.

