Anushka Sharma Post : आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB ) संघाने बाजी मारली आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपट पटकावलं आहे. ३१ मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून एकतर्फी पराभव केला. स्टार क्रिकेटपटू विराट कोहली या अंतिम सामन्याचा सामनावीर झाला. विराटची पत्नी व लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील यावेळी मॅच पाहण्यासाठी उपस्थित होती.
आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावल्यावर अनुष्काचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अभिनेत्री पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सोहळ्यादरम्यान मैदानात उपस्थित होती. यानंतर अनुष्काने आरसीबीच्या संघातील प्रत्येक खेळाडूची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. विराट-अनुष्काचे विजयानंतरच्या सेलिब्रेशनचे बरेच फोटो अन् व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचदरम्यान अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका खास पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अनुष्काने RCB च्या विजयानंतर एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो सेलिब्रेशन पार्टीदरम्यानचा आहे. यामध्ये RCB चा कोच दिनेश कार्तिक आणि विराटची झलक पाहायला मिळत आहे. विराट कोहलीने यावेळी एक खास टी-शर्ट घातला होता. या टी-शर्टच्या पुढील बाजूला ‘Champions’ असं लिहिण्यात आलं आहे. तर टी-शर्टच्या मागच्या बाजूला एक खास कोट लिहिलण्यात आला आहे.
‘One Felt Nice, We Did It Twice’ पहिल्यांदा ट्रॉफी जिंकून छान वाटलं होतं, म्हणून आम्ही आता दुसऱ्यांदा सुद्धा ट्रॉफी जिंकलीये असं या कोटमधून सुचित करण्यात आलं आहे. हा फोटो शेअर करत अनुष्काने यावर ‘लव्ह इमोजी’ दिला आहे.

याशिवाय विराट-अनुष्काने विजयानंतरच्या सेलिब्रेशन पार्टीमध्ये एकत्र डान्स सुद्धा केला. त्यांच्या डान्सची झलक RCB ने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय.
दरम्यान, अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने १५५ धावा केल्या होत्या. यानंतर आरसीबीने हे लक्ष्य १८ व्या षटकातच पूर्ण करून आपलं दुसरं जेतेपद पटकावलं. यावेळी विराटने नाबाद ७५ धावांची खेळी केली. आयपीएलच्या इतिहासात सलग दोन हंगामांसाठी आयपीएल ट्रॉफी जिंकणारा आरसीबी हा तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने आणि मुंबई इंडियन्सने हा रेकॉर्ड केला होता.
