बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने ‘प्यूमा इंडिया’बद्दल एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात परवानगीशिवाय फोटो पोस्ट केल्याबद्दल तिने त्यांना चांगलंच खडसावलं होतं. पण त्यानंतर काही तासांतच अनुष्का शर्मा मुंबईच्या रस्त्यांवर प्यूमा ब्रँडला प्रमोट करताना दिसली त्यावेळी लोकही आश्चर्यचकीत झाले. ‘प्यूमा’ आणि अनुष्का यांच्या भांडण हा फक्त पब्लिसिटी स्टंट होता हे सर्वांच्या लक्षात आलं. आता अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामुळे तिला नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल केलं जात आहे.

अनुष्का शर्माच्या ‘प्यूमा’ प्रमोशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा एका स्वँकी कारमधून येताना दिसत आहे. तिच्या आसपास खूपच गर्दी झालेली या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यामुळे रस्त्यावरील ट्राफिक जाम झालं आहे. अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी तिच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. काहीच कारण नसताना रस्त्यावर लोकांना गोळा करून वाहनांना अडथळा निर्माण केल्याने आता अनुष्का ट्रोल होत आहे.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?

आणखी वाचा- “विवाहित असाल…” अनुष्काने सांगितले लवकर लग्न करण्यामागचे खरं कारण

अनुष्काचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ पाहून युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, “हॅलो ज्युनियर जया बच्चनजी” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “पोलीसही या लोकांना काहीच बोलत नाहीत, पूर्ण ट्राफिक जाम.” आणखी एका युजरने अनुष्काच्या वागण्यावर टीका करत लिहिलं, “हे काही कलाकार एकदम मूडी आणि स्वार्थी आहेत. जेव्हा आपलं काम असतं तेव्हा कॅमेरासमोर काहीही करतील. मीडियाला बोलवून बोलवून गोड बोलतील नाहीतर मग तोंड लपवून जातील, मीडियावर भडकतील. एक पोजही देणार नाहीत.”

anushka sharma comments

दरम्यान अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं तर अनुष्का शर्मा मागच्या बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. पण लवकरच ती ‘चकदा एक्सप्रेस’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर मागच्या बऱ्याच काळापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधरित असलेला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.