scorecardresearch

“…हे चुकीचं आहे” अनुष्का शर्माने लेक वामिकाच्या झोपेबद्दल शेअर केलेली पोस्ट चर्चेत

अनुष्काने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिची मातृत्वाची व्यथा मांडण्याचा मजेशीर प्रयत्न केला आहे.

“…हे चुकीचं आहे” अनुष्का शर्माने लेक वामिकाच्या झोपेबद्दल शेअर केलेली पोस्ट चर्चेत
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती पती क्रिकेटपटू विराट कोहली आणि लेक वामिका यांच्याबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. याशिवाय ती काही सुविचार आणि तिच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या पोस्ट दिसल्या तर त्याही शेअर करत असते. नुकतीच तिने इन्स्टाग्रामला स्टोरी टाकली आहे. यातून तिने तिची व्यथा मांडण्याचा मजेशीर प्रयत्न केला आहे.

वामिकाला झोपायचं नसलं तरी तिला झोपवावं लागतं आणि अनुष्काला झोपायचं असतं, पण वामिका झोपत नसल्याने तिलाही झोपता येत नाही. म्हणजे ज्यांना झोपायचं आहे ते ज्यांना झोपायचं नाही अशांना झोपवत असतात हे अनफेअर चुकीचं आहे, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.

anushka sharma post
अनुष्का शर्माची पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

अनुष्काने अलीकडेच तिचा ‘चकदा एक्सप्रेस’चं शूटिंग पूर्ण केलंय. त्यानंतर नवीन वर्षाचं स्वागत तिने पती आणि लेकीबरोबर दुबईत केलं. सध्या अनुष्का विराट आणि वामिकाबरोबर धार्मिक यात्रेवर आहेत. यावेळी त्यांनी बाबा नीम करोलीचे दर्शनही घेतले.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 17:45 IST

संबंधित बातम्या