आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदावर नाव कोरंल. आयपीएलच्या इतिहासात चारवेळा जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामातही आयपीएलचा किताब जिंकला. चेन्नईला शेवटच्या षटकात दोन चेंडूंवर १० धावांची आवश्यकता असताना चेन्नईचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजाने चौकार आणि षटकार ठोकला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२३ चा किताब जिंकण्यात यशस्वी ठरली. आता या सामन्यावर अभिनेत्री अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सोमवारी आयपीएल २०२३ चा फायनल सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. गुजरातने २० षटकात २१४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पु्न्हा एकदा मैदानात पावसाच्या सरी कोसळल्याने सामना डकवर्थ लुईस नियमानुसार खेळवण्यात आला. त्यामुळे चेन्नईला १५ षटकांत १७० धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत अटीतटीचा झाला. चेन्नईला शेवटच्या षटकात दोन चेंडूंवर १० धावांची आवश्यकता असताना रविंद्र जडेजाने चौकार आणि षटकार ठोकत चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदावर नाव कोरंल.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

अनुष्का शर्मा ही कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एम.एस.धोनीने जडेजाला उचलताना फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना तिने चेन्नईचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा : एका बाजूला धोनी, तर दुसऱ्या बाजूला उत्कर्षा; ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचा पहिला फोटो समोर, म्हणाला…

“अटीतटीचा सामना, अप्रतिम विजय आणि खूपच छान संघ”, असे अनुष्काने म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदावर नाव कोरल्यावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.