अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. या दोघांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूट दरम्यान झाली होती. विराट अनुष्काला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता. पुढे दोघांमध्ये मैत्री होऊन त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ११ डिसेंबर २०१७ मध्ये विराट – अनुष्काने इटलीत थाटामाटात लग्नगाठ बांधली. आयुष्यात अनेक चढउतार येऊनही अनुष्का विराटच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली. आज या जोडप्याला ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखलं जातं.

लग्नानंतर अनुष्काने काही काळ बॉलीवूडमध्ये काम केलं आणि त्यानंतर मनोरंजन विश्वापासून ती काहीशी दूर गेली. तरीही एक निर्माती म्हणून अनुष्का आजही सक्रिय असते. विराट- अनुष्काने लग्नाच्या चार वर्षांनी गोंडस अशा मुलीला जन्म दिला. त्यांच्या लेकीचं नाव वामिका असून ती आता लवकरच साडेतीन वर्षांची होणार आहे. याशिवाय यंदा १५ फेब्रुवारी रोजी विरुष्काच्या घरी आणखी एका चिमुकल्याचं आगमन झालं. या जोडप्याने त्यांच्या लेकाचं नाव अकाय असं ठेवलं आहे.

हेही वाचा : “५० वर्षे मुंबईत राहतोय, गिरणगावात मोठा झालो, पण…”, अंकुश चौधरीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाला, “ही अस्वस्थता…”

विराट-अनुष्काने त्यांच्या दोन्ही मुलांचे चेहरे आजवर कुठेही दाखवलेले नाहीत. त्यांचे फोटो काढू नका अशी विनंती अभिनेत्रीने यापूर्वीच पापाराझींना केलेली आहे. तसेच विराट- अनुष्का स्वत: देखील त्यांच्या मुलांचा चेहरा दिसेल असे कोणतेही फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. आपल्या मुलांना त्यांच्या बालपणाचा आनंद घेता यावा यासाठी अनुष्काने हा निर्णय फार पूर्वीच घेतला होता. आपल्या मुलांचा चेहरा जरी दाखवला नसला तरीही अनुष्काने वामिकाची एक कलाकृती त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

हेही वाचा : सुप्रसिद्ध बॉलीवूड गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजाराचं निदान, काहीच ऐकू येत नसल्याची दिली माहिती

साडेतीन वर्षांच्या वामिकाने एका पाटीवर फुलांचं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एका बाजूला अनुष्काने फुलं काढली आहेत. तर, दुसऱ्या बाजूला वामिकाने तिला जमले तसं ओबडधोबड चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. हा गोड फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वामिकाने रेखाटलं खास चित्र

दरम्यान, यापूर्वी ‘फादर्स डे’ निमित्त अनुष्काने एक खास ग्रीटिंग कार्ड इन्टाग्रामवर शेअर केलं होतं. यामध्ये वामिका आणि तिचा लहान भाऊ अकाय या दोघांच्या पायांचे ठसे उमटवले होते. हे ग्रीटिंग खास विराटसाठी तयार करण्यात आलं होतं. अनुष्काने शेअर केलेला तो फोटो सुद्धा सर्वत्र व्हायरल होता. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर मुलं झाल्यावर आता अनुष्का ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.