आयफोन बनवणाऱ्या अ‍ॅपलचे कंपनीचे सीईओ टीम कुक सध्या भारतात आहेत. भारतातील पहिल्या अ‍ॅपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी ते येथे आले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते उद्योगपती मुकेश अंबानी यांना त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच अँटिलियाला येथे जाऊन भेटले. यासोबतच त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडा पाववर देखील मनसोक्त ताव मारला आहे.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितबरोबर टीम कुक वडापाव खातानाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. टीम कुक यांनी हा फोटो शेअर करत ट्विटरवरुन माधुरीचे आभार मानले आहेत. टीम कुक म्हणतात, ” मला माझ्या पहिल्या वडा पावची ओळख करून दिल्याबद्दल माधुरी दीक्षितचे खूप खूप आभार. हे खूपच चविष्ट होते.”

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
Why did Nitin Gadkari say that blockade the forest officials in Gadchiroli
“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…
panvel cyber crime marathi news, panvel crime news
पनवेल : अधिकच्या परताव्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

आणखी वाचा : ब्रेसलेटबरोबर आता ‘हे’ घडयाळ ठरतंय सलमानसाठी लकी? भाईजानच्या घड्याळाची किंमत ऐकून हैराण व्हाल

माधुरीनेही हा फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत लिहिले, “मुंबईत स्वागत करण्यासाठी वडा पाव खाऊ घालण्यासारखा उत्तम पर्याय नाही!” याबरोबरच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आकाश अंबानी आणि ईशा अंबानी टीम कुकबरोबर गेटजवळ दिसत आहेत.

टीम कुक मंगळवारी मुंबईत भारतातील पहिले अ‍ॅपल स्टोअरचे उद्घाटन करणार आहेत. हे अॅपल स्टोअर मुंबईतील बीकेसी वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू होणार आहे. इतकंच नव्हे तर टीम भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनाही भेटतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच टीम कुक यांचा हा भारत दौरा खास असणार आहे यात काहीच शंका नाही.