arbaaz khan broke up with girlfriend giorgia andriani rumours after her statement | Loksatta

अरबाज खानचं गर्लफ्रेंडशी ब्रेकअप? जॉर्जिया एंड्रियानीच्या वक्तव्याने चर्चांना उधाण; म्हणाली, “आमचं नातं….”

मलायकाशी घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खान मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला करतोय डेट

अरबाज खानचं गर्लफ्रेंडशी ब्रेकअप? जॉर्जिया एंड्रियानीच्या वक्तव्याने चर्चांना उधाण; म्हणाली, “आमचं नातं….”
(फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

अरबाज खान मलायकाशी घटस्फोट झाल्यानंतर मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतोय. दोघेही गेल्या २-३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. जॉर्जिया अरबाजपेक्षा तब्बल २२ वर्षांनी लहान आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. पण अलीकडेच जॉर्जियाने केलेल्या एका वक्तव्यामुळे अरबाज आणि तिचा ब्रेक अपच्या चर्चांना उधाण आलंय.

जॉर्जियाने तिच्या एका मुलाखतीत याबाबत सूचक इशारा दिला आहे. जॉर्जियाने अरबाजला बॉयफ्रेंड नाही तर चांगला मित्र म्हटलं आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, जॉर्जिया म्हणाली, “माझा आणि अरबाज खानचा लग्नाचा कोणताही विचार नाही. करोना लॉकडाऊननंतर आम्हा दोघांमधील नातं खूप बदललं आहे.” दरम्यान, मुलाखतीत जॉर्जियाला तिच्या आणि अरबाजच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, “मी मलायका आणि अरबाजच्या कुटुंबाला अनेकदा भेटले आहे. अरबाज माझा खूप चांगला मित्र आहे. पण आमचा लग्नाचा कोणताही प्लॅन नाही. लॉकडाउनमुळे आमचं नातं बदललं आहे.”

“मी गरोदर असल्याचं कळताच पालकांनी…” नीना गुप्तांनी सांगितली जुनी आठवण

दरम्यान, जॉर्जियाने ब्रेकअपबद्दल स्पष्टपणे भाष्य केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यात नात्यात अडचणी असू शकतात, असं म्हटलं जातंय. दोघांचं वय हे देखील कारणीभूत असू शकतं. अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियांनी यांच्या वयात जवळपास २२ वर्षांचं अंतर आहे. एकीकडे अरबाज खान ५५ वर्षांचा आहे. तर जॉर्जिया ३३ वर्षांची आहे. दोघांच्या वयातील अंतरामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं गेलंय.

“ती अतिशय…” शम्मी कपूर यांची एक अट अन् मुमताज यांनी संपवलं होतं नातं

जॉर्जियाच्या अगोदर अरबाज खानने मलायका अरोराशी लग्न केलं होतं. दोघांचा प्रेमविवाह होता. १९९८ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्नानंतर १५-१६ वर्षांनतर त्याचं नात संपुष्टात आलं. २०१७ मध्ये मलायका आणि अरबाज यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अरबाजने जॉर्जियाला डेट करायला सुरुवात केली तर दुसरीकडे मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 18:10 IST
Next Story
“चित्रपटाला व्हल्गर म्हणणाऱ्यांच्या विरोधात…” ‘द काश्मीर फाइल्स’ वादावर पल्लवी जोशींनी मांडली भूमिका