अरबाज खानचं सलीम खान व हेलन यांच्या नात्याबाबत भाष्य, काय म्हणाला अभिनेता?
सलमान खान व त्याच्या कुटुंबियांची नेहमीच बी-टाऊनमध्ये चर्चा रंगताना दिसते. सलमान, अरबाज, सोहेल खान या तीनही भावाचं खासगी आयुष्य तर कोणापासूनच लपून राहिलेलं नाही. शिवाय सलमानचे वडील सलीम खान यांचंही वैवाहिक आयुष्य चर्चेत राहिलं. हेलन या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. आजा या खान कुटुंबियांमध्ये सगळं काही ठिक आहे. पण जेव्हा सलीम यांनी हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं तेव्हा नेमकं काय घडलं? याबाबत अरबाजने भाष्य केलं आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
सलीम यांनी जेव्हा हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांना एक गोष्ट सांगितली होती. याचबाबत अरबाजने खुलासा केला आहे. ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरबाज म्हणाला, “आम्ही गेल्या बराच काळापासून एकत्र राहत आहोत. तसेच हेलन आंटी आमच्या खूप जवळची आहे. आम्ही इतका काळ एकत्र राहूनही त्यांना हेलन आंटीच म्हणतो. कारण आमचं नातंच तसं आहे”.
“जेव्हा हेलन या आमच्या कुटुंबामध्ये आल्या तेव्हा आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं की, मला माहित आहे तुम्ही तुमच्या आईच्या (सलीम यांची पहिली पत्नी) बाजूने असणार. या जगात तुम्ही तुमच्या आईवर सर्वात जास्त प्रेम करता. तुम्ही हेलन यांच्यावर तुमच्या आई एवढं प्रेम करणार नाही. हेलन यांच्यावर तुम्ही प्रेम नाही केलं तरी एका गोष्टीची तुमच्याकडून अपेक्षा आहे की, त्यांचा आदर करा”.
“तुमच्या आईप्रमाणेच हेलन यांचा आदर करा. कारण त्या आता माझ्या आयुष्यातीलच एक भाग आहेत. माझ्याप्रती तुमच्या मनामध्ये प्रेम व सन्मान असेल तर तुम्ही याचा स्विकार कराल”. सुशीला चरक या सलीम यांच्या पहिल्या पत्नी आहेत. सलीम व हेलन यांनी लग्न केल्यानंतर खान कुटुंबामध्ये वाद सुरू झाले. मात्र सलीम यांनी आपल्या मुलांना यापासून दूर ठेवलं.